Public App Logo
Profile Picture

Basweshwar Dawle

@basweshwar170
251Followers
1Following
SP ऑफिस समोरच गुंडागर्दी; चहा सेंटरची तोडफोड, मारहाण CCTV मध्ये कैद

विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात NCR दाखल

लातूर, दि. 4 -शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आयशा कॉलनी परिसरात एका चहा सेंटरमध्ये घुसून तोडफोड व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी दोन तरुण दुचाकी क्रमांक MH24 CE 4917 थेट हॉटेलच्या किचनमध्ये घुसवतात. CCTV फुटेजनुसार, पांढरा प्रिंटेड शर्ट घातलेल्या तरुणाने हॉटेल कामगाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने किचन ओट्यावरील भांडी, कढई फेकून मोठे नुकसान केले.

यावेळी हॉटेलमधील महिला व इतर कामगारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देत एका कामगाराला मारहाण करण्यात आली. सुमारे 10 मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

या प्रकरणी फिर्यादी अलीम अहमद शेख (वय 51, रा. आयशा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात NCR क्र. 1425/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच असा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.
बाभळगाव-राजीव गांधी चौक रिंग रोडवर जुगार अड्डा उद्ध्वस्त, LCB ने 10 जणांना ठोकल्या बेड्या

लातूर, दि. 1 ऑक्टोबर 2026 -लातूर शहरातील बाभळगाव चौक ते राजीव गांधी चौकाला जोडणाऱ्या रिंग रोड परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आली असून 72 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवरील गोजमगुंडे मंगल कार्यालयाच्या बाजूला लगजकर यांच्या शेतातील झाडीमध्ये तिर्रट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली होती. खात्री करून पंचांसह सायंकाळी 5.30 वाजता छापा टाकला असता दोन रिंगणात 10 जण जुगार खेळताना आढळले. यावेळी हसन शेख रा. लातूर हा एक जण फरार झाला.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे पत्ते जप्त केले आहेत.

अटक आरोपी - 1) अमजद बाबू पठाण, वय 32, रा. सम्राट चौक, वडार गल्ली 2) वैजनाथ नागनाथ काळे, वय 35, रा. आनंद नगर, तानाजी चौक 3) बलदेव रामसिंग बावरी, वय 32, रा. वीर हणमंतवाडी, मार्केट यार्ड 4) बबलू सुरेश गायकवाड, वय 33, रा. बौद्धनगर 5) शिवा बाबुसिंग बावरी, वय 27, रा. वीर हणमंतवाडी 6) सिद्धार्थ संजय सिरसाट, वय 26, रा. बौद्धनगर 7) जमीर गौस बागायन, वय 24, रा. शाहुअली मोहल्ला, साठफुटी रोड 8) नवीन रविंद्र लोंढे, वय 28, रा. सम्राट चौक 9) अजय आनंद कांबळे, वय 25, रा. बौद्धनगर 10) याजीद हाकानी शेख, वय 34, रा. बरकतनगर (सर्व रा. लातूर) व फरार आरोपी हसन शेख रा. लातूर.

यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, विनोद चलवाड, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, जमीर शेख, प्रेमदास राठोड, प्रविण कोळसुरे, तुळशीराम बरुरे यांनी केली आहे.
उदगीर तालुक्यात चाललंय काय? 

आपल्या तालुक्यातील  जुनी झाडं कापून नेली जात आहेत. सोबतचा फोटो आज संध्याकाळी रिंगरोड परिसरात काढलेला आहे. एका ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त झाडं!

आधीच आपल्याकडे पाऊस पडत नाही, जमिनीची धूप चालू आहे, आणि वर हे लाकूड माफिया आपला तालुका वाळवंट करायला निघालेत.
प्रशासन झोपलंय का? वनविभाग, तहसीलदार, पोलीस यांना हे ट्रक दिसत नाहीत का?

माझी सर्वांना विनंती - हा फोटो जास्तीत जास्त शेअर करा. उद्या आपल्या पोरांना सावली सुद्धा मिळणार नाही.

<nis:link nis:type=tag nis:id=उदगीर nis:value=उदगीर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=वृक्षतोड nis:value=वृक्षतोड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=latur nis:value=Latur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mahaforest nis:value=MahaForest nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=collectorlatur@mahaforest nis:value=CollectorLatur@MahaForest nis:enabled=true nis:link/> @District Collector Latur @Latur Police
SP ऑफिस समोरच गुंडागर्दी; चहा सेंटरची तोडफोड, मारहाण CCTV मध्ये कैद

विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात NCR दाखल*

लातूर, दि. 4 -शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आयशा कॉलनी परिसरात एका चहा सेंटरमध्ये घुसून तोडफोड व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी* दोन तरुण दुचाकी क्रमांक MH24 CE 4917 थेट हॉटेलच्या किचनमध्ये घुसवतात. CCTV फुटेजनुसार, पांढरा प्रिंटेड शर्ट घातलेल्या तरुणाने हॉटेल कामगाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने किचन ओट्यावरील भांडी, कढई फेकून मोठे नुकसान केले.

यावेळी हॉटेलमधील महिला व इतर कामगारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देत एका कामगाराला मारहाण करण्यात आली. सुमारे 10 मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

या प्रकरणी फिर्यादी अलीम अहमद शेख (वय 51, रा. आयशा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात *NCR क्र. 1425/2026* दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच असा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.
कपाळे गल्लीच्या रोकडे हनुमान युवक गणेश मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

उदगीर: श्री रोकडे हनुमान युवक गणेश मंडळ, कपाळे गल्ली, उदगीर यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमास गंगाधर पाटील, सुरेश सुरशेट्ट, देवेंद्र पसारे, गुरुलिंग मठपती व शिवराज डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा मंडळाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विनोद सुरशेट्ट, उपाध्यक्ष शंकर आवाळे, कार्याध्यक्ष अमोल कपाळे, निवडणूक प्रमुख नागेश कपाळे, अजय कपाळे, संदेश नेमताबादे, महादेव कपाळे, रमाकांत कपाळे, अभिषेक लदाडे, महादेव मुतंगे, सागर हलमंडगे, महेश कपाळे, वीरेश धाडगे, प्रदीप कपाळे, राजेश आडे, महेंद्र कपाळे, अभिजीत महाजन, शिवप्रसाद आडे, महादेव पसारे, बसवराज मुतंगे, गुरुनाथ सुरशेट्ट, परमेश्वर सुरशेट्ट, संगम सुरशेट्ट, निलेश देशमुख, गणपत आडे, रतिकांत मुतंगे, योगेश मुतंगे, गुंडाप्पा मुतंगे, बालाजी मुतुंगे, अरविंद मुतंगे, अभिजीत कपाळे, आशिष बिरादार, दीपक कपाळे, वैष्णव धुमाळे, संजय हलमडगे, संतोष मठपती, रवी आडे, वीरभद्र मुतंगे आदी उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन मंडळाचे मार्गदर्शक मनोज अण्णा कपाळे यांनी केले.
लातूर जिल्ह्यात 2 ते 16 ऑक्टोबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर, दि. 1 (प्राईम लाईव्ह न्यूज नेटवर्क) :कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 2 ऑक्टोबर, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 16 ऑक्टोबर, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी द्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

---

*<nis:link nis:type=tag nis:id=️⃣ nis:value=️⃣ nis:enabled=true nis:link/> हॅशटॅग :
<nis:link nis:type=tag nis:id=laturnews nis:value=LaturNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturdistrict nis:value=LaturDistrict nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=shastrabandi nis:value=ShastraBandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jamavbandi nis:value=JamavBandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturpolice nis:value=LaturPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=breakingnews nis:value=BreakingNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtranews nis:value=MaharashtraNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=primelivenews nis:value=PrimeLiveNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturupdate nis:value=LaturUpdate nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturkar nis:value=Laturkar nis:enabled=true nis:link/>
अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा, AHTU ची कारवाई

लातूर : लातूर शहरातील होळकर नगर परिसरात भाड्याच्या घरात महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

होळकर नगर, अंबाजोगाई रोड येथे प्रियंका बाळासाहेब केंद्रे वय 33 हिने भाड्याच्या घरात महिलांना बोलावून पुरुष ग्राहकांना बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासाठी गोविंद हनुमान केंद्रे वय 26 हा दलाल म्हणून काम करीत होता. दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 17 वर्षे 9 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून 2000 रुपये रोख, मोबाईल फोन असा एकूण 7000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 678/2026 अन्वये BNS कलम 143, 144, 3(5), पोक्सो अधिनियम कलम 16, 17, 18, बाल न्याय अधिनियम कलम 78 आणि PITA अधिनियम कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक डॉ. भगीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ पाटील, सदानंद योगी, सुधामती वंगे, लता गिरी, सचिन मुंडे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चवरे, एमआयडीसी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
बसस्टँडवर सोनं चोरणाऱ्या दोन महिला अटकेत, 8 गुन्ह्यांची उकल!

लातूर :बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरूड-अकोला बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विविध बसस्थानकांवरील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित तब्बल 10 लाख 06 हजार रुपये किमतीचे 78.15 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लातूर, अहमदपूर व भादा येथील चोरीच्या 08 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक बसस्थानकांवरील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. दि. 2 ऑक्टोबर रोजी पथकाला मुरूड-अकोला बसस्थानक येथे दोन महिला संशयास्पदरीत्या थांबलेल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांच्या जवळील पिशवीत हिरवट रंगाच्या स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपींमध्ये स्वाती उर्फ रविना उमाकांत तपसाळे, वय 35 वर्षे, रा. आष्टा जहांगीर, ता. उमरगा, जि. धाराशिव आणि महादेवी सर्जेराव देडे, वय 40 वर्षे, रा. न्यू जय नगर, लातूर असे असून त्यांच्याकडून गांधी चौक पोलीस ठाणे 2 गुन्हे, अहमदपूर पोलीस ठाणे 4 गुन्हे, भादा पोलीस ठाणे 2 गुन्हे मधील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, रसूल पठाण, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, सुरेश कलमे, राजेश कंचे, गोविंद येलमटे, आनंद हल्लाळे, प्रेमदास राठोड, गोविंद भोसले, तुळशीराम बरूरे, सुरेखा मदने, अंजली गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.
१२ वर्षीय पीडितेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; API एस.जी. द्रोणाचार्य व हवालदार गणेश मालवदे यांच्या तपासाची ठोस फलश्रुती

लातूर । नागझरी परिसरात घडलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात आरोपी पवन बाळासाहेब हरबडे (रा. लातूर) याने पीडितेला लातूर शहर फिरवून आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून पुणे येथे नेले होते. आरोपी नंतर बहिणीच्या घरी कोणीही नसताना तिच्यावर अत्याचार केला होता.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी २ फेब्रुवारी २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा रजि. क्र. ७४/२०२५ अन्वये पोक्सो कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. द्रोणाचार्य यांनी हाताळला, तर तपास मदतनीस म्हणून पोलीस हवालदार *गणेश मालवदे* यांनी काम पाहिले. त्यांनी जमा केलेले भक्कम पुरावे, साक्षीदार, वैद्यकीय बाबी आणि घटनाक्रम याची न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारी साखळी उभी केली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता एम. एस. महिंद्रकर यांनी बाजू मांडली.

पुराव्यांचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी पवन हरबडे यास दोषी ठरवले. न्यायालयाने पोक्सो कायदा कलम ४ आणि भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) अन्वये २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

तपास अधिकाऱ्यांचा सन्मान: API द्रोणाचार्य यांची बदली सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे झाली असून ते लातूरमध्ये कार्यरत नाहीत, मात्र त्यांनी लातूरमध्ये केलेल्या या तपासाची कहाणी न्यायालयीन निकालानंतर अधोरेखित झाली आहे.

पीडितेच्या कुटुंबासाठी हा निकाल न्यायाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
शैक्षणिक विकासासाठी लॉयन्स क्लब व उदयगिरी लॉयन्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद : माजी मंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर(प्राईम लाईव्ह न्युज नेटवर्क) दि. ३  लॉयन्स क्लब, उदगीर व उदयगिरी लॉयन्स असोसिएशन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले लॉयन्स स्टडी सेंटर हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण, आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने लॉयन्स क्लबने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.

उदगीर शहरात लॉयन्स क्लब, उदगीर व उदयगिरी लॉयन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉयन्स स्टडी सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ. संजय बनसोडे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटिया, जिल्हा परिषद सभापती ज्ञानेश्वर बिरादार, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जॉनी मिया, शशिकांत बनसोडे, नगरसेवक शिवकुमार कांबळे, वर्षा कांबळे, प्रकाश बिरादार, गुरुनाथ बिरादार, ॲड. गुलाबराव पटवारी, प्रा. महेश बसपुरे, डॉ. भाग्यश्री घाळे, मुरलीधर जाधव, व्यंकट मोरे, दीपक बलसुरकर, कोमल मुंदडा, तृप्ती मुंदडा, धनश्री अदेप्पा, भाग्यश्री पोतदार, प्रेरणा जैन, ला. विवेक जैन, ला. प्रवीण मुंदडा, प्रा. अनंत दापकेकर यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, "शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि जिद्द आहे. मात्र, अनेकदा योग्य सुविधा आणि मार्गदर्शनाअभावी त्यांच्या स्वप्नांना अपेक्षित दिशा मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देणारे लॉयन्स स्टडी सेंटर त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची भूमिका बजावेल."

"स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची शिस्त, सातत्य आणि योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेऊन आपले ध्येय निश्चित करावे आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे," असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, सामाजिक संस्थांनी शिक्षण, आरोग्य आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी असेच विधायक उपक्रम राबवावेत. लॉयन्स क्लब आणि उदयगिरी लॉयन्स असोसिएशनने हाती घेतलेला हा उपक्रम उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
निकी बारजवळ उभ्या कारने घेतला अचानक पेट 🔥

लातूर शहरातील निकी बारच्या बाजूला उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

आगीत कारचे मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

<nis:link nis:type=tag nis:id=लातूर nis:value=लातूर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturnews nis:value=LaturNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nikibar nis:value=NikiBar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=carfire nis:value=CarFire nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=breakingnews nis:value=BreakingNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturcity nis:value=LaturCity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=firebrigade nis:value=FireBrigade nis:enabled=true nis:link/>
मातृभूमी विद्या संकुलात जागतिक हृदय दिनानिमित्त जनजागृती

उदगीर:(प्राईम लाईव्ह न्यूज नेटवर्क)मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातृभूमी महाविद्यालय, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूल आणि इनर व्हील क्लब, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सविता पदातुरे होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दत्तात्रय पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रियांका राठोड यांनी केली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दत्तात्रय पवार यांनी हृदयविकार व हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, प्रमुख लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, व्यसनांपासून दूर राहणे तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सविता पदातुरे यांनी दैनंदिन जीवनशैलीमध्ये छोटे-छोटे सकारात्मक बदल करून हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी ठेवता येते, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण मद्देवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेखा नक्षत्रे यांनी केले.

यावेळी प्रा. रणजीत मोरे, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. अन्वेश हिप्पळगावकर, राहुल जाधव, नेहा वाघमारे, ऋतुजा दहिकांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, २१ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

लातूर, दि. ०२ ऑक्टोबर - शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल २१ महागडे मोबाईल फोन शोधून काढण्यात शिवाजीनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. हे सर्व मोबाईल आज मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

नागरिकांकडून हरवलेल्या मोबाईलबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची शिवाजीनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करत विविध ठिकाणांहून २१ मोबाईल शोधून काढले.

आज पोलीस ठाण्यात बोलावून हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

ही उल्लेखनीय कामगिरी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक *मा. श्री. अमोल तांबे*, अपर पोलीस अधीक्षक *मा. श्री. मंगेश चव्हाण*, उपविभागीय पोलीस अधिकारी *मा. श्री. समीरसिंह साळवे* यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक *श्री. संतोष पाटील* आणि त्यांच्या टीमने केली आहे.

या कामगिरीमुळे शिवाजीनगर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*<nis:link nis:type=tag nis:id=primelivenews nis:value=PrimeLiveNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=latur nis:value=Latur nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturpolice* nis:value=LaturPolice* nis:enabled=true nis:link/>
*⚠️ उदगीरकरांनो सावधान ! फसवणूक टाळा ⚠️*

उदगीर तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर काही फळविक्रेते पोत्यात भरून स्वस्तात मोसंबी विकत आहेत.

ही मोसंबी अत्यंत खराब आणि निकृष्ट दर्जाची असून, घरी नेल्यावर एका दिवसातच सडत आहेत. नागरिकांची फसवणूक होत आहे.

तरी उदगीरमधील सर्व जनतेने अशी मोसंबी खरेदी करताना काळजी घ्यावी, स्वस्ताच्या आमिषाला बळी पडू नका आणि फसू नका !

<nis:link nis:type=tag nis:id=udgir nis:value=Udgir nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tahsiloffice nis:value=TahsilOffice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mosambi nis:value=Mosambi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fasavnuq nis:value=Fasavnuq nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=udgirkar nis:value=Udgirkar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=primelivenews nis:value=PrimeLiveNews nis:enabled=true nis:link/>
उदगीर तालुक्यात दुष्काळ जाहीर; ग्रामीण भागात पाणीटंचाईवर प्रशासन अलर्ट - गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार

उदगीर ( प्राईम लाईव्ह न्यूज नेटवर्क): उदगीर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून, ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली.

श्री. मेडेवार यांनी सांगितले की, सध्या उदगीर तालुक्याच्या ग्रामीण भागात सात ठिकाणी पाणी स्रोतांचे अधिग्रहण सुरू आहे. एखाद्या गावात पाणी कमी पडल्यास सुरुवातीला विहीर अधिग्रहण केले जाणार असून, पाणी पुरत नसेल तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींना आराखडा तयार करण्याचे आदेश

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या सध्याच्या पाणी स्रोताचे पाणी किती दिवस पुरेल, याचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. हा स्रोत नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत किती दिवस चालेल, याचे नियोजन करून घेतले जात आहे. त्यानंतर प्रथम अधिग्रहण आणि गरज पडल्यास टँकरची व्यवस्था केली जाणार आहे.

तलावांच्या पाण्याची परिस्थिती जलसंधारण विभागाकडून घेण्यात येत असून, यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने प्रशासनाने स्रोतांची माहिती घेऊन पुढील नियोजन पूर्ण केले असल्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी स्पष्ट केले.

 Udgir News, Latur Dushkal, Pani Tanchai, BDO Narendra Medewar, Gram Panchayat
उदगीर तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती; केवळ ६०% पाऊस, दोन प्रकल्प कोरडे - तहसीलदार राम बोरगावकर

उदगीर (लातूर): महाराष्ट्रभर दुष्काळाची परिस्थिती असून त्याचा मोठा फटका उदगीर तालुक्यालाही बसला आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्केच पर्जन्यमान झाले असून तालुक्यातील १३ पैकी २ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत, अशी माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली.

उदगीरची जीवनवाहिनी असलेल्या तिरू आणि अन्य एका मोठ्या प्रकल्पात केवळ डेड स्टोरेज शिल्लक असून पिण्याच्या पाण्यासाठी ते राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित लघु प्रकल्पांमध्ये केवळ ३० ते ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणी उपशावर कारवाई सुरू

पाणीसाठे संरक्षित करण्यासाठी महसूल, पोलीस, MSEB, ग्रामविकास विभागाचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाणी उपसा करू नये म्हणून समुपदेशन करण्यात येत आहे, तर न ऐकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.

टँकर आणि अधिग्रहण

सध्या तालुक्यात ग्रामीण भागात उन्हाळ्यात अधिग्रहित केलेल्या २२ विहिरी/बोअर पैकी ७ ठिकाणी अधिग्रहण चालू आहे. नवीन मागणी आली नसली तरी डिसेंबरनंतर पुन्हा अधिग्रहण करावे लागणार असून खाजगी जलसाठ्यांची ओळख पटवून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन

नळाला येणारे पाणी जपून वापरा, रस्त्यावर पाणी वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन बोरगावकर यांनी केले आहे. पॅनिक होऊ नका, प्रशासन तुमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतात जाऊन १०० टक्के पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा, AHTU ची कारवाई

लातूर : लातूर शहरातील होळकर नगर परिसरात भाड्याच्या घरात महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

होळकर नगर, अंबाजोगाई रोड येथे प्रियंका बाळासाहेब केंद्रे वय 33 हिने भाड्याच्या घरात महिलांना बोलावून पुरुष ग्राहकांना बोलावून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासाठी गोविंद हनुमान केंद्रे वय 26 हा दलाल म्हणून काम करीत होता. दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 17 वर्षे 9 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून 2000 रुपये रोख, मोबाईल फोन असा एकूण 7000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 678/2026 अन्वये BNS कलम 143, 144, 3(5), पोक्सो अधिनियम कलम 16, 17, 18, बाल न्याय अधिनियम कलम 78 आणि PITA अधिनियम कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक डॉ. भगीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ पाटील, सदानंद योगी, सुधामती वंगे, लता गिरी, सचिन मुंडे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चवरे, एमआयडीसी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
लातूर जिल्ह्यात 2 ते 16 ऑक्टोबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर, दि. 1 (प्राईम लाईव्ह न्यूज नेटवर्क) :कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 2 ऑक्टोबर, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 16 ऑक्टोबर, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी द्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

---

*<nis:link nis:type=tag nis:id=️⃣ nis:value=️⃣ nis:enabled=true nis:link/> हॅशटॅग :
<nis:link nis:type=tag nis:id=laturnews nis:value=LaturNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturdistrict nis:value=LaturDistrict nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=shastrabandi nis:value=ShastraBandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jamavbandi nis:value=JamavBandi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturpolice nis:value=LaturPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=breakingnews nis:value=BreakingNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtranews nis:value=MaharashtraNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=primelivenews nis:value=PrimeLiveNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturupdate nis:value=LaturUpdate nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturkar nis:value=Laturkar nis:enabled=true nis:link/>
लातुरच्या ठाकरे चौकात दहशत माजवणार्‍यांची पोलीसांनी काढली धिंड
किरकोळ कट मारण्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांना अटक, ठाकरे चौकातील घटनेचा छडा

लातूर:( प्राईम लाईव्ह न्युज नेटवर्क)  लातूर शहरातील ठाकरे चौक परिसरात किरकोळ कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात झाले. या घटनेची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 462/2026, कलम 109(1), 115(2), 353, 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर समीरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथकांमार्फत तपास सुरू केला.

ठाकरे चौक परिसरातील गणेश मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी बारकाईने तपासले. फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणातून हल्ल्यात सहभागी आरोपींची ओळख पटविण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 1) अभिषेक निळकंठ काळे (वय 23), रा. निवळी, ता. जि. लातूर, सध्या रा. प्रकाशनगर, दत्त मंदिरासमोर, लातूर, 2) जतीन अरुण गायकवाड (वय 20), रा. रामेश्वर, ता. जि. लातूर, सध्या रा. पुणे, 3) शिवप्रसाद गोविंद सोनवणे (वय 19), रा. कुलस्वामिनी नगर, पीव्हीआर चौक, लातूर यांचा समावेश आहे. तपासादरम्यान जतीन गायकवाड हा पुणे येथे वास्तव्यास असून घटनेनंतर पुण्याहून लातूर येथे आल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठाकरे चौक परिसरातील ओंकार गणेश मंडळाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला. उपलब्ध फुटेजचे बारकाईने परीक्षण करून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. त्यामुळे घटनेनंतर अल्पावधीतच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करणे शक्य झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर समीरसिंह साळवे तसेच पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामधील पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस अंमलदार संजय फुलारी, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे, नारायण शिंदे, प्रशांत ओगले, राहुल सोनकांबळे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राजाभाऊ मस्के व डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि. तिडके करीत आहेत.
पानंद रस्त्याच्या वादातून 2 खून! निलंगा कोर्टाने 5 जणांना ठोठावली जन्मठेप

 शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डांगेवाडी येथे पानंद रस्त्याच्या कारणावरून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू व चौघे जखमी झालेल्या प्रकरणात निलंगा येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सत्र खटला क्र. 02/2020 मध्ये सुनावण्यात आला.

                दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी डांगेवाडी येथे पानंद रस्त्याच्या कारणावरून आरोपींनी शेतात काम करीत असलेल्या सुभाष दयानंद सुडे, दयानंद नामदेव सुडे व इतरांवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सुभाष दयानंद सुडे व दयानंद नामदेव सुडे यांचा मृत्यू, तर अन्य चार जण जखमी झाले होते.

                 याप्रकरणी मयत सुभाष सुडे यांचा मुलगा नामदेव सुभाष सुडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 150/2019, कलम 302, 307, 148, 147, 143, 504 सह 149 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर बी. बदम यांनी करून प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे तसेच जप्ती पंचनाम्यांसह उपलब्ध सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

                   सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार तसेच जप्ती पंच यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. उपलब्ध साक्षी-पुराव्याच्या आधारे मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. पवार, निलंगा यांनी आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली.

1. ज्ञानोबा अंगद ओनामे
2. जगन्नाथ विश्वंभर ओनामे
3. राजकुमार विश्वंभर ओनामे
4. राम बाबुराव ओनामे
5. भागवत बाबुराव ओनामे. सर्व रा. डांगेवाडी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर.

                    वरील पाचही आरोपींना कलम 302 सह 149 भादंवि अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास; कलम 307 सह 149 भादंवि अन्वये 5 वर्षे कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास; तसेच कलम 148 भादंवि अन्वये 3 वर्षे, कलम 147 भादंवि अन्वये 2 वर्षे आणि कलम 143 भादंवि अन्वये 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

                   सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर, निलंगा यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अॅड. सी. जे. सबनीस-पाटील यांनी सहाय्य केले. कार्यालयीन कामकाजासाठी एच. जी. बिरादार (कनिष्ठ लिपिक) तसेच कोर्ट पैरवी कर्मचारी सौ. ए. जी. कांबळे यांनी सहकार्य केले.

छान बातमी व हेडिंग कर मधे हेडिंग नको
उदगीर मध्ये 25 ऑक्टोबरला अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा धडकणार; आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आयोजन

उदगीर  दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा समिती व आंबेडकर प्रेमी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य महामोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील 59 जातीसमूह आणि समस्त आंबेडकरी प्रेमी जनतेच्या वतीने 25 ऑक्टोबर 2026, रविवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे भव्य 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महामोर्चाचे नेतृत्व मा. आनंदराज आंबेडकर साहेब करणार आहेत.

या महामोर्चाच्या माध्यमातून अ, ब, क, ड अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, आरक्षणाची 100% अंमलबजावणी करावी व शासकीय क्षेत्रातील सर्व रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, असंवैधानिक उपवर्गीकरणासाठी नेमलेली बदर समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

या महामोर्चाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. आनंदराज आंबेडकर, मा. ॲड. अमण दादा आंबेडकर, मा. ॲड. डॉ. सुरेश माने, मा. चंद्रकांत हंडोरे साहेब, माजी मंत्री मा. राजकुमार बडोले साहेब, माजी मंत्री मा. बबनराव घोलप, मा. रोहिदास बनसोडे साहेब, मा. जितेंद्र कुमार इंदिसे, मा. दादासाहेब शेळके, मा. राजू थाटे, मा. रुक्मिणी लोंढे यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्कांचे व आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी, तसेच आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आपला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी 59 जातीसमूहांसह सर्व आंबेडकरी अनुयायांनी व नागरिकांनी 25 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उदगीर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा समिती, उदगीर च्या वतीने करण्यात आले आहे.
जागतिक हृदय दिनानिमित्त गोल्डन गेट पब्लिक स्कूलची स्पंदन हॉस्पिटलला शैक्षणिक भेट

उदगीर, दि. २९:मातृभूमी विद्या संकुल संचलित गोल्डन गेट पब्लिक स्कूल, उदगीरच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त दि. २९ सप्टेंबर रोजी स्पंदन हॉस्पिटल, उदगीर येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. सुनील माने, डॉ. प्रिया माने, डॉ. सोनाळे, डॉ. देलमटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांचे सकारात्मक पद्धतीने स्वागत केले. शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांना जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

डॉ. सुनील माने यांनी विद्यार्थ्यांना हृदयाची काळजी कशी घ्यावी, रोज व्यायामाचे महत्त्व आणि जंक फूडचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हृदयावरील उपचार पद्धती आणि वैद्यकीय उपकरणांची प्रत्यक्ष माहिती दिली. डॉ. प्रिया माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी रुग्णांना गुलाबाची फुले देऊन त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तसेच नर्स आणि वॉर्ड बॉय यांनाही गुलाब देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. हॉस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्दी ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात आली होती.

हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष सतिश उस्तुरे व संचालिका उषा कुलकर्णी-उस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्राचार्या दीपिका बिरादार तसेच एडमिन स्वाती भांगे यांनी नियोजन केले, तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
हुंड्यासाठी छळ; मुलगी असल्याने गर्भपात केल्याचा आरोप, उदगीरमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा

उदगीर : माहेरून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भातील मुलगी असल्याचे कारण देत जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उदगीरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ११ जून २०२१ पासून ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सासरच्या मंडळींनी संगनमत करून फिर्यादीस माहेरून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण व शिवीगाळ केली. तसेच मांत्रिकाला बोलावून अघोरी कृत्य व जादूटोणा केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोटात मुलगी असल्याचे सांगून धाराशिव येथील एका खासगी दवाखान्यात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ८९, ८५, ११५(२), ३५२, ३(५) सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ चे कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक रेडेकर यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
लातूरात पुन्हा कोयता गँगची दहशत! विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; थरार CCTV त कैद

लातूर (प्राइम लाईव्ह न्यूज):लातूर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत सुरु असल्याचं समोर आलंय. शहरातील ठाकरे चौकात विद्यार्थ्यांवर कोयता गँगने हल्ला केला असून या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झालेत.

या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

*CCTV मध्ये काय दिसतंय?*
कोयता गँगच्या दहशतीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजमध्ये ३ ते ४ जणांचे टोळके हातात कोयते घेऊन हल्ला करताना दिसत आहेत.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.