
शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, २१ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत
लातूर, दि. ०२ ऑक्टोबर - शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल २१ महागडे मोबाईल फोन शोधून काढण्यात शिवाजीनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. हे सर्व मोबाईल आज मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
नागरिकांकडून हरवलेल्या मोबाईलबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची शिवाजीनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करत विविध ठिकाणांहून २१ मोबाईल शोधून काढले.
आज पोलीस ठाण्यात बोलावून हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
ही उल्लेखनीय कामगिरी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक *मा. श्री. अमोल तांबे*, अपर पोलीस अधीक्षक *मा. श्री. मंगेश चव्हाण*, उपविभागीय पोलीस अधिकारी *मा. श्री. समीरसिंह साळवे* यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक *श्री. संतोष पाटील* आणि त्यांच्या टीमने केली आहे.
या कामगिरीमुळे शिवाजीनगर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*#PrimeLiveNews #Latur #LaturPolice*
Latur, Latur | Oct 2, 2026