उदगीर तालुक्यात चाललंय काय?
आपल्या तालुक्यातील जुनी झाडं कापून नेली जात आहेत. सोबतचा फोटो आज संध्याकाळी रिंगरोड परिसरात काढलेला आहे. एका ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त झाडं!
आधीच आपल्याकडे पाऊस पडत नाही, जमिनीची धूप चालू आहे, आणि वर हे लाकूड माफिया आपला तालुका वाळवंट करायला निघालेत.
प्रशासन झोपलंय का? वनविभाग, तहसीलदार, पोलीस यांना हे ट्रक दिसत नाहीत का?
माझी सर्वांना विनंती - हा फोटो जास्तीत जास्त शेअर करा. उद्या आपल्या पोरांना सावली सुद्धा मिळणार नाही.
#उदगीर #वृक्षतोड #Latur #MahaForest #CollectorLatur@MahaForest @District Collector Latur @Latur Police
Latur, Latur | Oct 4, 2026