शोलेच्या दोस्ती’वरून डोंबिवलीत राजकीय वाद! रवींद्र चव्हाणांच्या ‘धोक्याच्या’ इशाऱ्यावर मनसेचा पलटवार
‘काचेचे तुकडे उचलणारे कार्यकर्ते आम्ही… शोलेची दोस्ती आहे, पण ज्याच्यासोबत बसतात त्यांनाच सर्वात जास्त जीवाचा धोका’ – राजू पाटील-श्रीकांत शिंदेंच्या जवळिकीवरून रवींद्र चव्हाणांचा अप्रत्यक्ष इशारा.
‘३० वर्षे एकत्र असताना मैत्री आठवली नाही का?’ – ‘काचेचे तुकडे उचलणाऱ्यांनीच डोंबिवलीतील मैदाने चोरली’आधी जनतेची कामं करा, मग इतरांना सल्ले द्या’ मैदानांच्या मुद्द्यावरून हर्षद पाटलांचा रवींद्र चव्हाणवर हल्लाबोल.
भाजप आमदार रवींद्र चव्हाण-मनसे शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांच्यातील शाब्दिक युद्धाने कल्याण-डोंबिवलीचं राजकीय वातावरण तापलं.
मनसेच्या पलटवाराला भाजप काय उत्तर देणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Kalyan, Thane | Aug 18, 2026