कल्याण पूर्व येथील पत्री पूल परिसरात धक्कादायक
प्रकार
भावासोबत झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात काही तरुणांचा एका तरुणासोबत वाद सुरू असताना तरुणाचा भाऊ वाद सोडवण्यासाठी गेला असता आरमान शेख या तरुणावर चार ते पाच तरुणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
फक्त वादात मध्यस्थी का करतोय, या रागातून आरमान शेख याच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भररस्त्यात धारदार शस्त्राने झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांकडून तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
Kalyan, Thane | Aug 18, 2026