Public App Logo
Profile Picture

Jilha Varta (जिल्हा वार्ता)

@jilhavarta
226Followers
0Following
गरजू नागरिकांचे स्वप्नातल्या घराचे स्वप्न धुळीस मिळवून कष्टाचे लाखो रुपये हडप करणाऱ्या  टायकुन्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करा - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी
कल्याणमधील पुनर्विकास प्रकल्पावरून रहिवाशांमध्ये दोन गट आमने सामने

खडकपाडा पोलीस ठाण्यात गोंधळ.

टायकुन्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करत सखोल चौकशी करा - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी
कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ  जवानाने प्रवाशाचे  वाचवले प्राण 

संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद 

कल्याण रेल्वे स्थानकातील फ्लॅट फॉर्म क्रमांक चारवर.विदर्भ एक्सप्रेस पकडत असतांना एक प्रवासी फ्लॅट फॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकला होता ट्रेन मध्ये असणाऱ्या एका प्रवासी मदतीसाठी हात देत होता याच दरम्यान आरपीएफचे जवान गणेश तारू यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे जीव वाचले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे
महात्मा गांधी जयंती निमित्त मिशन हरित केडीएमसी अंतर्गत नेतीवली टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा ,

30 हजार झाडे लावणार असल्याची आयुक्तांची माहिती
‘व्यसनमुक्त भारत’ जनजागृतीसह विद्यार्थिनींना कराटे–मार्शल आर्टचे प्रशिक्षण

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम; कल्याण व डोंबिवलीतील ६०० विद्यार्थिनींना प्रशिक्षण

कल्याण : समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी तरुण पिढीमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासोबतच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महापालिकेच्या ‘सेवा संकल्प’ अभियानाअंतर्गत ‘व्यसनमुक्त भारत’ जनजागृती अभियान तसेच विद्यार्थिनींसाठी कराटे–मार्शल आर्ट स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत सुभेदारवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींसाठी कराटे आणि मार्शल आर्टच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करता यावे, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण व्हावे तसेच त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, अश्लील वर्तन तसेच विविध प्रकारच्या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

हा उपक्रम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सभापती सारिका जाधव, महिला व बालकल्याण विभागाच्या उपआयुक्त कांचन गायकवाड, महापालिका शिक्षणाधिकारी विजय सरकटे, सहायक आयुक्त ढवळू चौरे, सुभेदारवाडा शाळेचे मुख्याध्यापक सागर धामोडे, शाळेचे संचालक, वूमन्स वेलफेअर फाऊंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, कराटे प्रशिक्षकांची टीम आणि समुपदेशक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम एक महिना सुरू राहणार असून कल्याण आणि डोंबिवली विभागातील प्रत्येकी ३०० विद्यार्थिनींना, म्हणजेच एकूण ६०० विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

व्यसनमुक्तीबाबत जनजागृती आणि मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण या दोन्ही बाबींचा समन्वय साधणारा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

एच पी पुजारी उर्फ अण्णा नावाचा गँगस्टर ने 25 लाखाची खंडणी मागितल्याचा ऑडियो,

परदेशातून आलेल्या फोन कॉलने कल्याणच्या राजकीय वर्तुळात खळबळ 

कुणाल पाटील यांना परदेशातून आलेल्या फोन कॉल वरून कुटुंबसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

या बाबतचा ऑडिओ कॉल देखील समोर आला आहे

 कुणाल पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली
डोंबिवलीतील रुणवाल सिटी सोसायटीत सदस्यांमध्ये हाणामारी; कमिटी मेंबर्सना लोखंडी रॉडने मारहाण, CCTV व्हिडिओ व्हायरल

डोंबिवलीतील रुणवाल सिटी सोसायटीमध्ये सदस्यांमधील वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची घटना समोर आली.

सोसायटीतील काही इमारतींच्या सदस्यांमध्ये वाद झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले.

याच वादातून एका गटातील सदस्यांनी कमिटी मेंबर्सना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीचा संपूर्ण प्रकार सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले.

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सोसायटीतील अंतर्गत वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
KDMCचा वर्धापनदिन साधेपणाने; दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाखांचा निधी!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा वर्धापनदिनाचा भव्य कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

कल्याण : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) यंदाचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना फाटा देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या खर्चाऐवजी सामाजिक कार्याला प्राधान्य देत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याशिवाय, महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन दिले जाणार आहे.
कल्याणमध्ये ३२ अंगणवाडी सेविकांचा सन्मान; २५० चिमुकल्यांना खाऊवाटप!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन; भाजपा नवीन कल्याण मंडळाचा सामाजिक उपक्रम

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याअंतर्गत भाजपा नवीन कल्याण मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३२ अंगणवाडी सेविकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर २५० लहान बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.

अंगणवाडी सेविका या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान देत असतात. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच चिमुकल्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, नगरसेवक कुमार श्यामल गायकर, कल्याण जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, सरचिटणीस ज्योती भोईर आणि प्रीती दीक्षित, नवीन कल्याण मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा भावना मनराजा, सरचिटणीस कल्पना पिल्लई, उपाध्यक्षा वंदना कबाडे, सोनाली बोबडे, पौर्णिमा मोरे, वर्षा जोशी, रेश्मा पाटील, सचिव किरण भोसले आणि कन्हैया महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजातील सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करणे आणि बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हीच सेवा पंधरवड्याची खरी भावना असल्याचे भाजपा नवीन कल्याण मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल मनोहर काठे यांनी सांगितले. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
KDMC च्या कचऱ्याच्या गाडीतून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर! शाळा आणि रुग्णालयांजवळ अस्वच्छतेचा विळखा ,मनसे पदाधिकार्याने व्यक्त केला संताप
अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या
टाक्यांची कामे येत्या 3 महिन्यात पूर्ण करत लोकांपर्यंत 
पाणी पोहचवा अन्यथा तीव्र आंदोलन - शिवसेना
 पदाधिकार्यांचा KDMC ला इशारा
शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कल्याण न्यायालयात प्राप्त; रमेश म्हात्रेंसह चौघांना ५ ऑक्टोबरपूर्वी आत्मसमर्पणाचे निर्देश

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत कल्याण न्यायालयात प्राप्त झाली.

सर्वोच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींचा जामीन रद्द केला आहे.

कल्याण न्यायालयाने दिलेल्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्यात आला.

चारही आरोपींना **५ ऑक्टोबर २०२६ पूर्वी संबंधित विचारण न्यायालयात आत्मसमर्पण** करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

आत्मसमर्पण न केल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साक्षीदार संरक्षण देण्याचे आदेश.

सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर कल्याण न्यायालयात प्राप्त झाल�
डोंबिवली कोळेगावात म्हात्रे कुटुंबीयांचा ‘साखर चौथ’ गणपती उत्सव उत्साहात!

गेल्या १४ वर्षांची परंपरा कायम; दीड दिवसांच्या उत्सवात विधिवत प्रतिष्ठापना, पूजा-अर्चा आणि आरतीला भक्तांची गर्दी
डोंबिवली : अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या भाद्रपद वद्य चतुर्थी अर्थात संकष्टी चतुर्थी निमित्त साजरा केला जाणारा ‘साखर चौथ’ गणपती उत्सव डोंबिवलीनजीकच्या कोळेगाव येथे म्हात्रे कुटुंबीयांच्या घरी भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे.
सुरेश बामा म्हात्रे आणि मीना सुरेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गेल्या १४ वर्षांपासून साखर चौथीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा जपली जात आहे. यंदाही मोठ्या उत्साहात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येत असून गणरायाची पूजा, नैवेद्य तसेच सकाळ-संध्याकाळ आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या दर्शनासाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरा�
डोंबिवलीत  युवक-युवतींसाठी युवा सेनेचा रोजगाराचा महामेळावा! १ ते १० ऑक्टोबरदरम्यान नावनोंदणीची संधी; प्रत्यक्ष मुलाखती, प्रशिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा युवा सेनेचा पुढाकार!
स्मार्ट मीटर विरोधात कल्याणातील हॉटेल चालक आक्रमक ,महावितरण विरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, महावीतरणकडून स्मार्ट मीटर साठी सुरू असलेली जोर जबरदस्ती सहन करणार नाही ...काँग्रेसचा इशारा
डोंबिवलीत ‘अंगणातील उत्सव’; ५ अंगणवाड्यांतील १२९ चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत भाजपाच्या डोंबिवली पश्चिम मंडलाचा उपक्रम; बालकांशी संवाद साधत आनंदाची उधळण

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडलाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘अंगणातील उत्सव’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत डोंबिवली पश्चिम परिसरातील ५ अंगणवाड्यांना भेट देत १२९ नोंदणीकृत बालकांसोबत उत्सव साजरा करण्यात आला.

‘सेवा हीच साधना… बालमनात आनंद फुलविणे हाच अंगणातील उत्सव’ या संकल्पनेनुसार सकाळी ११ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्र नगर, राजूनगर, मोतीबाई निवास, विघ्नहर्ता अंगणवाडी आणि साई सदन या पाच केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पाच अंगणवाड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

महाराष्ट्र नगर अंगणवाडी, देवीचा पाडा येथे ३४ बालकांनी सहभाग घेतला. अंगणवाडी सेविका मीना सकपाळ यांच्यासह संदीप (रमा) म्हात्रे, मेधा बर्वे, गजानन ब्रम्हे, पायल जैन, आदिती काळे आणि शुभांगी शिंदे यांनी नियोजन केले.

राजूनगर अंगणवाडी क्रमांक १६ येथे १८ बालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सेविका मंगला शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना पाटील, संजय पाटील, जयप्रकाश सावंत, राहुल श्रीधर म्हात्रे आणि वैभव मुरबाडे यांनी जबाबदारी सांभाळली.

मोतीबाई निवास, चिंचोड्याचा पाडा येथे १५ बालकांच्या उपस्थितीत उत्सव झाला. सेविका सानिका वाडेकर यांच्यासह श्वेता धोपटे, निलीमा भोईर, प्रिया कडू, सविता तेलगोटे, शिल्पा मोरे, सुरेखा गुप्ता, वंदना मोरे, प्रशांत पाटेकर, राहुल श्रीधर म्हात्रे, सुरज ठोंबरे, मनोज वैद्य, विश्वास सावंत आणि जयप्रकाश सावंत उपस्थित होते.

विघ्नहर्ता अंगणवाडी, उमेश नगर, देवीचा पाडा येथे ३२ बालकांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सेविका भारती ठिकारे, रेखा असोदेकर आणि प्रिया गुजर यांनी सहभाग घेतला.
तर साई सदन अंगणवाडी, उमेश नगर येथे ३० बालकांच्या उपस्थितीत उपक्रमाचा समारोप झाला. सेविका वर्षा गोडबोले यांच्यासह सुमेधा थत्ते, प्रतीक्षा पाटील आणि प्रशांत पाटेकर यांनी संयोजन केले.या संपूर्ण उपक्रमादरम्यान भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावत लहानग्यांशी संवाद साधला, त्यांचे कोडकौतुक केले आणि त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण पश्चिम अहिल्या बाई चौकातील रस्ता जलमय ...

साचलेल्या पाण्यातून नागरिकांचे तारेवरची कसरत करत मार्गक्रमण
भिवंडी सामुहिक बलात्कार प्रकरण !
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार अद्याप फरार कसे ?भाजपचे लोकं त्यांना मदत करतायत ,त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे अन्यथा काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार - महिला प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा इशारा 

पीडितेच्या बाजूने खंबीर उभ्या असलेल्या काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्या जीविताला धोका आहे,या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्यासह आरोपी असलेला शैलेश पाटील हा गुंड प्रवृत्तीचा आहे ...

काँग्रेस पीडितेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,भाजप महिला महिला विरोधी आहे ...नरेंद्र पवार यांना तत्काळ अटक करा अन्यथा काँग्रेस तीव्र आंदोलन करेल
कल्याण पश्चिमेत अतिधोकादायक इमारतीतच महावितरणच कार्यालय सुरू; ग्राहक-कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात! स्ट्रक्चरल ऑडिटनंतर इमारत अतिधोकादायक घोषित करत KDMCकडून पाडकामाची बजावली नोटीस 

प्लास्टर निखळले, भिंतींना तडे; पत्रेही तुटलेल्या अवस्थेत तरी नोटीसनंतरही धोकादायक इमारतीत महावितरणचे कार्यालय सुरू

धोकादायक इमारतीतच कार्यालय सुरू असल्याने वीज ग्राहकांची दररोज मोठी गर्दी..ग्राहक-कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात.. मोठी दुर्घटनेची भीती
कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातून  दिवसाढवळ्या रिक्षा चोरी ; घटना CCTV मध्ये कैद.महालक्ष्मी हॉटेलजवळ रिक्षा उभी करून गेलेल्या चालकाची रिक्षा चोरट्याने पळवली.

लॉक आणि वायर तोडून चोरटा रिक्षा घेऊन फरार; महात्मा फुले पोलिसांत गुन्हा दाखल.गर्दीच्या स्टेशन परिसरात चोरीमुळे रिक्षाचालकांमध्ये भीती; पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे आरटीओवर कार्यालयावर ठिय्या आंदोलन

भाडेवाडीचा फेरविचार, रॅपिडो ई-बाईक टॅक्सीची परवानगी रद्द करावी, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
महिला बचत गट सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी
महिला बचत गटातील महिलांना KDMC मध्ये बिना डिपॉझिट पगारी "मार्शल"म्हणून नियुक्त करा - शिवसेना संघटिका  स्वाती मोहिते यांची मागणी ..
Narayani Events presents FOLK PRABODHAN — an amazing cultural experience coming for the first time to Kalyankars! 🚩✨

📅 4 October 2026
⏰ सायंकाळी ठीक ७ वाजता
📍 Balaji Lawns, Kalyan West

Traditional folk performance, vibrant 
energy आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची खास झलक! ❤️‍🔥

या, आपल्या कुटुंबासोबत हा खास अनुभव नक्की घ्या! 🚩
डोंबिवली मानपाडा रोडवर जेसीबीचा थरार; दोन वाहनांना धडक, मोठा अनर्थ टळला!
रूनवाल चौकात जेसीबीने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई 
डोंबिवली खंबाळपाडा परिसरात छापा टाकत
गुजरातला पाठविण्यात येणारा लाखोंच्या प्रतिबंधित दारूसाठ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक ,सात लाखांचा दारू साठा जप्त 

डोंबिवली : दिव-दमण येथून प्रतिबंधित दारू आणून ती गुजरातमधील राजकोट येथे विक्रीसाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना कल्याण क्राईम ब्रँच ने बेड्या ठोकल्यात. डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा, शेलार मैदानाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारूची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडून शोधमोहीम सुरू होती. त्याचदरम्यान डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा शेलार मैदानाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारू साठा असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच पथकाने
खंबाळपाडा परिसरातील शेडवर छापा टाकला.
या