Public App Logo
गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव! स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. राष्ट्रपतींचे ‘पोलीस शौर्य पदक’, तर 01 अधिकाऱ्यास ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे. तसेच गृह मंत्रालय, भारत सरकारकडून 27 अधिकारी व अंमलदारांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ आणि 03 अधिकारी व अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. सन 2023 मधील केडमारा आणि सन 2024 मधील कंत्रनगट्टा येथील पोलीस-माओवादी चकमकीत दाखविलेल्या धाडसपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. सन 2026 मध्ये गडचिरोली पोलीस दलाला एकूण 31 पोलीस शौर्य पदके प्राप्त झाली आहेत. सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी अभिनंदन करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. कर्तव्यनिष्ठा • शौर्य • सेवा गडचिरोली पोलीस दलाचा गौरवशाली सन्मान! #GadchiroliPolice #PoliceGall - Gadchiroli News