Public App Logo
स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोमके बिनागुंडा येथे फडकला तिरंगा! स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागासह राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. पडत्या पावसाचीही पर्वा न करता स्थानिक नागरिक व पोलीस दलाने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. दुर्गम भागात फडकणारा तिरंगा हा शांतता, विश्वास आणि बदलत्या गडचिरोलीचे प्रतीक ठरला. पाऊस बरसत राहिला… तिरंगा अभिमानाने फडकत राहिला! #GadchiroliPolice #IndependenceDay2026 #Binagunda #HarGharTiranga #MaharashtraPolice - Gadchiroli News