दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार!
मौजा गॅरापत्ती येथील आठवडी बाजारादरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून 84 नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. तसेच विविध आजार व पोषणविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
सन 2021 पासून 206 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 43 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत 9,971 हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी व 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सुरक्षेसोबतच आरोग्याचीही साथ… नागरिकांच्या सेवेसाठी गडचिरोली पोलीस सदैव तत्पर!
#GadchiroliPolice #HealthCamp #CivicAction #HealthyGadchiroli #MaharashtraPolice