Public App Logo
Profile Picture

गडचिरोली पोलीस

@gadchirolipolice
259Followers
0Following
अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची गडचिरोली पोलिसांकडून यशस्वी उकल; आरोपी जेरबंद

पोमकें घोट हद्दीतील नारायणपूर येथे दि. 05 सप्टेंबर 2026 रोजी घडलेल्या 60 वर्षीय महिलेच्या खुनाच्या गंभीर प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी बारकाईने तपास करत यशस्वी छडा लावला.

घटनास्थळावरील निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण, कौटुंबिक पार्श्वभूमीचा तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने संशयिताचा माग काढला. पोलीस तपासानुसार, पूर्ववैमनस्य व जुन्या वादातून हा गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाले असून संदीप रावजी टेकाम (वय 35) यास दि. 29/09/2026 रोजी अटक करण्यात आली.

मा. न्यायालयाने आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोमकें घोट यांच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषण आणि प्रभावी समन्वयातून क्लिष्ट गुन्ह्याची यशस्वी उकल.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimedetection nis:value=CrimeDetection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=PoliceAction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=investigation nis:value=Investigation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lcb nis:value=LCB nis:enabled=true nis:link/>
आधुनिक शेतीच्या दिशेने… गडचिरोलीतील शेतकऱ्यांची नवी वाटचाल! 

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’ अंतर्गत अतिदुर्गम भागातील 37 शेतकरी 17 व्या कृषीदर्शन व अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या 8 दिवसीय अभ्यास दौऱ्यात शेतकरी विविध कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे व प्रगत शेती प्रक्षेत्रांना भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि शेतीच्या नव्या पद्धती जाणून घेणार आहेत.

यापूर्वी आयोजित 16 कृषी अभ्यास दौऱ्यांतून 738 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, आधुनिक ज्ञानातून शेती अधिक सक्षम आणि शेतकरी अधिक समृद्ध करण्याचा हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

नवे तंत्रज्ञान • नवी दृष्टी • समृद्ध शेती
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policedadhalorakhidki nis:value=PoliceDadhaloraKhidki nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=projectkrushisamruddhi nis:value=ProjectKrushiSamruddhi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=farmerempowerment nis:value=FarmerEmpowerment nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=modernfarming nis:value=ModernFarming nis:enabled=true nis:link/> 

@dgpmaharashtra
कर्तव्याच्या वाटेवर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानाला विनम्र अभिवादन! 

दि. 28 सप्टेंबर 2009 रोजी कोपेला (झिंगानूर) येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले शहीद पोशि/181 नोगेश पोयाम यांच्या शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी दाखवलेले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग गडचिरोली पोलीस दलाच्या स्मरणात सदैव राहील.

शहीद वीर जवानाला विनम्र अभिवादन! 

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=salutetomartyrs nis:value=SaluteToMartyrs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policemartyrs nis:value=PoliceMartyrs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शहीदजवान nis:value=शहीदजवान nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सवात सुरक्षिततेसाठी गडचिरोली पोलीस सज्ज! 
गणेशोत्सव व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौक, मंडळ परिसर, वाहतूक व विसर्जन मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ड्रोनद्वारे गर्दी व संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अतिगर्दी टाळावी, महिला व मुलांची विशेष काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसर स्वच्छ ठेवावा.
सुरक्षित मार्ग • शिस्तबद्ध मिरवणूक • सुरक्षित विसर्जन
आपला उत्सव… आपली जबाबदारी!
गडचिरोली पोलीस दल — आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!
<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=Ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshvisarjan nis:value=GaneshVisarjan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safecelebration nis:value=SafeCelebration nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=communitypolicing nis:value=CommunityPolicing nis:enabled=true nis:link/> MaharashtraPolice
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व गणेश मंडळांना महत्त्वाचे आवाहन 

गणरायाला निरोप देताना उत्साहासोबत शांतता, शिस्त आणि सुरक्षितता जपूया.

मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार 11 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विदर्भात ध्वनीप्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिरवणुकीत निर्धारित ध्वनीमर्यादा पाळा. DJ, Plasma, Pressure-Mid Sound System व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या परिवर्तित वाहनांचा वापर करू नका. संबंधित मालक व चालकांनी सदर यंत्रणा व वाहने लॉक करून सीलबंद अवस्थेत सुरक्षित ठेवावीत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मिरवणूक निर्धारित मार्गानेच काढा, विसर्जनासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणांचाच वापर करा. गर्दीत महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या आणि पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

आपला उत्सव… आपली जबाबदारी!
गणरायाला निरोप दे
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर गडचिरोली पोलिसांचा मोठा प्रहार! 

पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) पथकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध निर्मिती व साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत ₹22,50,230/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाईत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा, उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले. प्रकरणात 04 आरोपींना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून अपराध क्र. 54/2026 नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यवसायाला आळा…
कायद्याची कठोर अंमलबजावणी!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=PoliceAction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=gatta nis:value=Gatta nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=illegaltobacco nis:value=IllegalTobacco nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tobaccofree nis:value=TobaccoFree nis:enabled=true nis:link/> CrimePrevention MaharashtraPolice Gadchiroli
कर्तव्याच्या वाटेवर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन! 

दि. 21 सप्टेंबर 1992 रोजी ग्यारापत्ती येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या गडचिरोली पोलीस दलातील सात शहीद वीर जवानांच्या शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग सदैव स्मरणात राहील व पोलीस दलाला प्रेरणा देत राहील.

शहीद वीर जवानांना विनम्र अभिवादन! 

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=salutetomartyrs nis:value=SaluteToMartyrs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policemartyrs nis:value=PoliceMartyrs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शहीदजवान nis:value=शहीदजवान nis:enabled=true nis:link/> विनम्रअभिवादन गडचिरोलीपोलीस
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे तसेच 17 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे भव्य जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्यात आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि आरोग्य सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्डसह विविध योजनांची कागदपत्रे लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=gadchirolipolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=gadchiroli nis:value=gadchiroli nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeforpeople nis:value=policeforpeople nis:enabled=true nis:link/>
आत्मसमर्पणातून नवजीवनाकडे… ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची भक्कम साथ!

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे तसेच दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे भव्य जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

मेळाव्यात विविध शासकीय पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास व आरोग्य सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्डसह पुनर्वसन निधीचे धनादेश वितरित करण्यात आले व आरोग्य तपासणी करण्यात आली.

नवी ओळख • नवा आत्मविश्वास • सन्मानाचे नवजीवन

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=gadchirolipolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=surrender nis:value=surrender nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=projectsanjivani nis:value=projectsanjivani nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=gadchirolinews nis:value=gadchirolinews nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सव साजरा करूया… एकतेने, पर्यावरणपूरक पद्धतीने आणि संस्कृती जपत! 

गणेशोत्सव हा श्रद्धा, एकता आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. गावात ‘एक गाव – एक गणपती’ संकल्पना राबवून उत्सवाचा आनंद सर्वांनी एकत्र साजरा करूया.

मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती व नैसर्गिक रंगांचा वापर करूया. ध्वनीप्रदूषण टाळून DJ मुक्त गणेशोत्सवाला प्राधान्य देत ढोल-ताशा, भजन, कीर्तन आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपल्या संस्कृतीचा वारसा जपूया.

एकता वाढवूया • पर्यावरण जपूया • परंपरा टिकवूया
गणेशोत्सव आनंदात, शांततेत आणि सुरक्षिततेत साजरा करूया!

गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshutsav nis:value=GaneshUtsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=Ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ecofriendlyganesh nis:value=EcoFriendlyGanesh nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=djfreeganeshotsav nis:value=DJFreeGaneshotsav nis:enabled=true nis:link/>

@dgpmaharashtra @mramesh_ips
अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य आणि सुराज्यासाठी लढण्याची प्रेरणा देणाऱ्या विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप!

गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाची सांगता करताना बाप्पाला भक्तिभावाने निरोप देऊया. विसर्जन मिरवणुकीत शांतता, शिस्त, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा जपत नियमांचे पालन करूया.

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 

गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshvisarjan nis:value=GaneshVisarjan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganpatibappamorya nis:value=GanpatiBappaMorya nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav nis:value=Ganeshotsav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safecelebration nis:value=SafeCelebration nis:enabled=true nis:link/>
आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… गोडलवाही येथे 101 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी!

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी मौजा गोडलवाही येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 101 नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

यावेळी फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

सन 2021 पासून गडचिरोली पोलीस दलाने 219 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.

सेवेतून विश्वास… आरोग्यातून सुरक्षिततेची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.

@mramesh_ips @dgpmaharashtra 
<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=healthcamp nis:value=HealthCamp nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=godalwahi nis:value=Godalwahi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeforpeople nis:value=PoliceForPeople nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=communitypolicing nis:value=CommunityPolicing nis:enabled=true nis:link/> HealthcareForAll
तान्हा पोळा — आपल्या कृषी संस्कृतीचा सुंदर वारसा!

शेतकरी संस्कृतीत बैलांचे स्थान केवळ श्रमाचे नाही, तर विश्वास, साथ आणि कृतज्ञतेचे आहे. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने बालगोपाळांमध्ये आपल्या ग्रामीण परंपरा, संस्कृती आणि मातीशी असलेले नाते जपूया.

परंपरेचा सन्मान करूया… कृषी संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!

तान्हा पोळ्यानिमित्त सर्व बालगोपाळांना हार्दिक शुभेच्छा!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tanhapola nis:value=TanhaPola nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=polafestival nis:value=PolaFestival nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtraculture nis:value=MaharashtraCulture nis:enabled=true nis:link/> शेतकरीसंस्कृती तान्हापोळा गडचिरोलीपोलीस
संकटाच्या क्षणी लक्षात ठेवा — डायल 112!

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त एक महत्त्वाचा संदेश — मदत मागणे हीच सुरक्षिततेकडे जाणारी पहिली पायरी.

तणाव, नैराश्य किंवा कठीण परिस्थितीत स्वतःला एकटे समजू नका. विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवाला तातडीचा धोका जाणवत असल्यास — त्वरित डायल करा 112.
आपत्कालीन मदतीसाठी — 112
एक कॉल… योग्य वेळी मिळणारी मदत!

<nis:link nis:type=tag nis:id=dial112 nis:value=Dial112 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=emergency112 nis:value=Emergency112 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=worldsuicidepreventionday nis:value=WorldSuicidePreventionDay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=suicideprevention nis:value=SuicidePrevention nis:enabled=true nis:link/> MentalHealthAwareness MaharashtraPolice PoliceForPeople
बळीराजाच्या जिवाभावाच्या साथीदाराला मानाचा मुजरा!

शेतकऱ्याच्या कष्टात सदैव साथ देणाऱ्या मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण — बैलपोळा!

महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या बैलपोळा सणाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

पशुधनाचा सन्मान करूया • संवर्धनाची जबाबदारी जपूया!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=bailpola nis:value=BailPola nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=बैलपोळा nis:value=बैलपोळा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पोळा nis:value=पोळा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शेतकरी nis:value=शेतकरी nis:enabled=true nis:link/> कृषीसंस्कृती MaharashtraPolice Gadchiroli
वाघोली शिवारातील खुनाचा 48 तासांत छडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात!

चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणाचा चामोर्शी पोलिसांनी गुणवत्तापूर्ण व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 48 तासांत उलगडा केला.

तपासादरम्यान मृतकाची ओळख पटवून साक्षीदार, तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात सहभागी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात अंमली पदार्थ व मद्य सेवनानंतर झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे.

क्लिष्ट गुन्ह्याचा वेगवान छडा…
तांत्रिक तपासातून सत्याचा शोध!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chamorshipolice nis:value=ChamorshiPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimedetection nis:value=CrimeDetection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeinvestigation nis:value=PoliceInvestigation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=PoliceAction nis:enabled=true nis:link/> MaharashtraPolice Gadchiroli
आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… येलचिल येथे 261 नागरिकांची मोफत तपासणी!

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 08 सप्टेंबर 2026 रोजी मौजा येलचिल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने 261 नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे दिली, तर 17 नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयांकडे शिफारस करण्यात आली.

यावेळी फिरत्या प्रदर्शनीद्वारे शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या विविध जनकल्याणकारी उपक्रमांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

आरोग्याची काळजी… विश्वासाची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=healthcamp nis:value=HealthCamp nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=yelchil nis:value=Yelchil nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeforpeople nis:value=PoliceForPeople nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=communitypolicing nis:value=CommunityPolicing nis:enabled=true nis:link/> MaharashtraPolice

@dgpmaharashtra @mramesh_ips @cmomaharashtra_
वाद मिटवा… समाधानाचा मार्ग निवडा!

राष्ट्रीय लोक अदालत — 12 सप्टेंबर 2026

प्रलंबित तसेच तडजोडीस पात्र प्रकरणे परस्पर सामंजस्याने, जलद आणि सुलभ पद्धतीने निकाली काढण्याची संधी.

न्यायालयीन शुल्क नाही • परस्पर तडजोड • जलद न्याय

आपल्या पात्र प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी व्हा!

<nis:link nis:type=tag nis:id=nationallokadalat nis:value=NationalLokAdalat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lokadalat nis:value=LokAdalat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nalsa nis:value=NALSA nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=accesstojustice nis:value=AccessToJustice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=legalawareness nis:value=LegalAwareness nis:enabled=true nis:link/> 12September2026
गडचिरोली फाईल्स | हिंसेच्या अंधारातून शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या नव्या पर्वाकडे!

चार दशकांच्या माओवादी हिंसेच्या आव्हानांवर मात करत गडचिरोली आज शांतता, विश्वास आणि विकासाची नवी ओळख घडवत आहे.

पोलीस–जनता संवाद आणि विश्वास दृढ करत ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’च्या माध्यमातून आत्मसमर्पणाला प्रोत्साहन देण्यात आले. आत्मसमर्पित सदस्यांसाठी कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य आणि समाजात सन्मानाने पुनर्वसनाची नवी वाट निर्माण करण्यात आली.

आत्मसमर्पित सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांमध्ये सुरक्षितपणे परतण्यास सहकार्य करत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल त्यांच्या पाठीशी उभे आहे.

भूतकाळ हिंसेचा… वर्तमान विश्वासाचा… भविष्य विकासाचे!
माओवादमुक्त आणि भयमुक्त गडचिरोली — शांतता, सुरक्षा आणि विकासाचा संकल्प!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=gadchirolifiles nis:value=GadchiroliFiles nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=newgadchiroli nis:value=NewGadchiroli nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=peaceanddevelopment nis:value=PeaceAndDevelopment nis:enabled=true nis:link/>
दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीचा गौरव… ‘प्रोजेक्ट उडान’च्या सहभागींचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान!

दिल्ली येथे आयोजित 9 व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलमध्ये गडचिरोलीच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या युवक-युवती व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा दि. 08 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सहभागी सदस्यांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत 04 आत्मसमर्पित माओवादी सदस्य आणि अनुप डान्स ग्रुपच्या 14 युवक-युवती अशा एकूण 18 जणांनी दिल्लीतील राष्ट्रीय मंचावर पारंपरिक वाद्यांच्या साथीने ‘रेला’ नृत्याचे मनमोहक सादरीकरण केले. या माध्यमातून गडचिरोलीची आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा तसेच शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देशभर पोहोचविण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत त्यांच्या सादरीकरणाला गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची ओळख असल्याचे सांगितले. आत्मसमर्पित सदस्यांनीही अतिदुर्गम गडचिरोलीतून देशाची राजधानी दिल्ली येथे आपली पारंपरिक कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.

दुर्गम भागातून दिल्लीच्या राष्ट्रीय मंचापर्यंत…
कलेतून आत्मविश्वास, संस्कृतीतून नवी ओळख!
‘प्रोजेक्ट उडान’ — नव्या गडचिरोलीच्या स्वप्नांना नवी भरारी!

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=projectudaan nis:value=ProjectUdaan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=northeaststudentfestival nis:value=NorthEastStudentFestival nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=reladance nis:value=RelaDance nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tribalculture nis:value=TribalCulture nis:enabled=true nis:link/> YouthEmpowerment PeaceAndUnity NewGadchiroli MaharashtraPolice Gadchiroli

@mramesh_ips @dgpmaharashtra
आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… येलचिल येथे 261 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी!

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. 08 सप्टेंबर 2026 रोजी मौजा येलचिल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 261 नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. तसेच 17 नागरिकांना पुढील तपासणी व उपचारांसाठी विविध रुग्णालयांकडे शिफारस करण्यात आली.

आरोग्य शिबिरासोबतच फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

सन 2021 पासून गडचिरोली पोलीस दलाने 207 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 43 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून, ‘ऑपरेशन रोशनी’च्या माध्यमातून 9,971 हून अधिक नेत्र तपासण्या व 1,412 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

सेवेतून विश्वास… आरोग्यातून सुरक्षिततेची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=healthcamp nis:value=HealthCamp nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=yelchil nis:value=Yelchil nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=communitypolicing nis:value=CommunityPolicing nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeforpeople nis:value=PoliceForPeople nis:enabled=true nis:link/> HealthcareForAll OperationRoshni MaharashtraPolice Gadchiroli
दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीच्या संस्कृतीचा ठसा… ‘रेला’ नृत्यातून शांतता आणि एकतेचा संदेश!

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जिल्ह्यातील युवक-युवती आणि आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. दिल्ली येथे दि. 04 व 05 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित 9 व्या ‘नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवल’मध्ये एकूण 18 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यामध्ये 04 आत्मसमर्पित माओवादी सदस्य आणि अनुप डान्स ग्रुपच्या 14 युवक-युवतींनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गडचिरोलीच्या आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या ‘रेला’ नृत्याचे मनमोहक सादरीकरण करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या सादरीकरणातून शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश राष्ट्रीय मंचावर पोहोचविण्यात आला.

विशेष म्हणजे, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना अशा राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात सहभागी होण्य
सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी करण्याचा प्रयत्न; अवघ्या 24 तासांत गडचिरोली पोलिसांकडून 3 आरोपी जेरबंद!

गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील जंगल सोसायटी परिसरात एका ज्वेलर्स व्यावसायिकाला अडवून त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकत सोन्या-चांदीचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या पथकांनी तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे वेगाने तपास करत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 3 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. 

या गुन्ह्यातील आणखी एका पाहिजे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असून, अशा गुन्हेगारी कृत्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अस�
हिंसेपासून नवजीवनाकडे… रक्षाबंधनातून आपुलकीचा नवा अध्याय!

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवजीवन वसाहत येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्य तसेच महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पोलीस अधिकारी व जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध पोलीस स्टेशन व पोमकें येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत अधिकारी व अंमलदारांसोबत सणाचा आनंद वाटून घेतला.

राखीच्या धाग्यातून केवळ रक्षणाचेच नव्हे, तर विश्वास, आपुलकी आणि नव्या जीवनाच्या प्रवासाचे नाते अधिक दृढ झाले.

विश्वासाचे नाते… सुरक्षेचे वचन!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.

<nis:link nis:type=tag nis:id=gadchirolipolice nis:value=GadchiroliPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=rakshabandhan nis:value=RakshaBandhan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=rakshabandhan2026 nis:value=RakshaBandhan2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=navjeevanvasahat nis:value=NavjeevanVasahat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> PoliceForPeople CommunityPolicing TrustAndSecurity Gadchiroli

@dgpmaharashtra @mramesh_ips
खाकी वर्दीतली माणुसकी… नवजात बाळासाठी गडचिरोली पोलीस ठरले जीवनदाते!

एटापल्ली तालुक्यातील शांता गावडे यांनी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात तिळ्या बाळांना जन्म दिला. मुदतपूर्व जन्म व कमी वजनामुळे तिन्ही बाळांवर NICU मध्ये उपचार सुरू असताना एका नवजात बालिकेच्या प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने तातडीने रक्ताची आवश्यकता निर्माण झाली.

रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस दलाने त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला. पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. गडचिरोली रक्त केंद्राच्या सहकार्याने आवश्यक रक्ताच्या दोन बॅग उपलब्ध झाल्यामुळे बाळाच्या उपचाराला वेळीच मदत मिळाली असून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

कर्तव्य केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरते नाही… गरजेच्या क्षणी जीव वाचवण्यासाठीही गडचिरोल�
गडचिरोली पोलीस (@gadchirolipolice) | Public App