गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!
पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेले अधिकारी व अंमलदार, उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 05 पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव!
#GadchiroliPolice #IndependenceDay2026 #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind
Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026