अभिजीत दीपके यांच्या पोस्टरला चप्पल मारत कल्याण भाजपचा निषेध ‘पंजाब-झारखंडवर बोल’च्या घोषणा देत दादरच्या आंदोलनाला प्रत्युत्तर
मुंबईच्या दादरमध्ये झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचे पडसाद आता कल्याणमध्ये उमटले आहेत... अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाविरोधात कल्याण भाजपच्या युवा सेल, मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केलं... हातात फलक घेत ‘बोल दीपके बोल, पंजाब-झारखंडवर बोल’ अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी दीपकेंचा निषेध केला... तर झाडू आणि कॉकरोचच्या पोस्टरवर दीपकेंचा फोटो लावत, या पोस्टरला चप्पल मारत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला...
Kalyan, Thane | Oct 4, 2026