हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात गडचिरोली पोलीसांना मोठे यश
पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीला गेलेले 21 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले.
सुमारे ₹6 लाख किमतीचे मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे, सन 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 90 मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात गडचिरोली पोलीसांच्या सायबर टीमला यश आले आहे.
मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास विलंब न करता CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवा आणि तात्काळ जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीसांशी संपर्क साधा.
गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #CyberSafety #CEIR #MobileRecovery #CyberCrime PublicSafety CitizenFirst MaharashtraPolice DigitalSafety SafeGadchiroli
67 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 5, 2026