राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.
तसेच, सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा विषयक जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत "सायबर हायजिन प्रतिज्ञा" घेण्यात आली. यामध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहार, वैयक्तिक माहितीची गोपनीयता तसेच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणाबाबत दक्ष राहण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS Maharashtra Cyber #gandhijayanti #lalbahadurshastrijayanti #cyberhygiene #ratnagiripolice #mahacyber
4 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 2, 2026