शौर्य, सेवा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव! 🇮🇳
80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापूर्ण सेवा पदक विजेत्या अधिकारी व अंमलदारांचा पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या 06 आणि उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त 30 अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी 05 अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शौर्याचा सन्मान • सेवेचा गौरव • कर्तव्याला सलाम!
#GadchiroliPolice #IndependenceDay2026 #PoliceGallantry #C60 #maharashtrapolice
@mramesh_ips @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @adv._ashish_jaiswal
39 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026