🚨केबल चोरी प्रकरणातील आरोपी रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात🚨
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत खेड पोलीसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईदरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेल्या केबलमधील तांब्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे व त्यांच्या पथकाने केली.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #ratnagiripolice #detection