भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान, रत्नागिरी येथे मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेने सलामी देण्यात आली तसेच पोलीस दलाची आकर्षक परेड सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी तसेच रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #IndependenceDay #tiranga #ratnagiri #RatnagiriPolice
7 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 15, 2026