
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सलग दोन महिन्यांत राज्यात अव्वल
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत "आपले सरकार" पोर्टल द्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून व जुलै २०२६ या सलग दोन महिन्यांत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Overall Top Performing Service तसेच Service with Highest Citizen Score या दोन्ही श्रेणींमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली असून, भविष्यातही नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #aplesarkar #ratnagiri #ratnagiripolice