मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना, मारुती मंदिर, शिवाजी स्टेडियमच्या मागील परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून एकूण ₹46,000/- किंमतीचा ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक *श्री. नितीन ढेरे* व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #saynotodrugs #missionphoenix #ratnagiri #ratnagiripolice