मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, नाचणे-काजरघाटी तिठा, पाण्याच्या टाकीजवळ, रत्नागिरी येथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून वाहनासह एकूण ₹1,88,900/- किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्रीमती अरांक्षा यादव (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली, परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #saynotodrugs #missionphoenix #ratnagiri #ratnagiripolice