Public App Logo
Profile Picture

अमरावती शहर पोलीस

@amravaticitypolice
325Followers
0Following
पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २५ व १५ वर्षे अत्यंत निष्ठेने, कौशल्याने व धैर्याने अखंड सेवा बजावल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
@dgpmaharashtra 
@mahacyber
स्वातंत्रदिनानिमित्त त्याग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास मनःपूर्वक सलाम.
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

<nis:link nis:type=tag nis:id=स्वातंत्र्यदिन_२०२६ nis:value=स्वातंत्र्यदिन_२०२६ nis:enabled=true nis:link/>
सायबर फसवणुकीतून येणारी रक्कम स्वीकारण्यासाठी Mule Account उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरुद्ध अमरावती शहर सायबर पोलिसांची उल्लेखनीय कारवाई.

🔹 दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये ६ आरोपी अटक
🔹 सुमारे ₹७१ लाखांचे आर्थिक व्यवहार उघडकीस
🔹 सायबर फसवणूक, ऑनलाइन गेमिंग व क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी Mule Account चा वापर
🔹 ६ मोबाईल हँडसेट व ६ SIM कार्ड, बँक पासबुक, ATM कार्ड व बँक खात्यांचा तपशील जप्त
🔹 सर्व आरोपींना पोलीस कोठडी; रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू
@dgpmaharashtra 
@mahacyber
📱 हरविलेले ५९ मोबाईल शोधून तक्रारदारांना परत! 👏

🚔 पोलीस स्टेशन गाडगेनगर, अमरावती शहर

डी.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरी

CEIR Portal च्या माध्यमातून माहे मे, जून व जुलै २०२६ दरम्यान तक्रारदारांचे हरविलेले एकूण ५९ मोबाईल शोधून काढण्यात गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाला यश आले.
स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) कार्यक्रमांतर्गत सायबर जनजागृती अभियान
<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=amravaticitypolice nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cyberpolice nis:value=cyberpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=muleaccount nis:value=muleaccount nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=cybercrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=safebanking nis:value=safebanking nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=financialfraud nis:value=financialfraud nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=1930 nis:value=1930 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersecurity nis:value=CyberSecurity nis:enabled=true nis:link/>
सायबर पोलीस स्टेशन, अमरावती शहर यांची मोठी यशस्वी कारवाई!

सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात येणारे Mule Account उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
👮 नागरिकांना आवाहन
✅ कमिशनच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, ATM कार्ड, UPI किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका.
✅ आपल्या नावावर बँक खाते उघडून ते इतरांच्या ताब्यात देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
✅ अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणाऱ्या किंवा Mule Account साठी एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, अमरावती शहर येथे द्या.
@dgpmaharashtra 
@mahacyber
अमरावती शहर पोलीसांचा विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण उपक्रम | 610 विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण

मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या संकल्पनेतून तसेच मा. पोलीस उपायुक्त श्री. यशवंत सोळंके (परि-01), श्री. श्याम घुगे (परि-02) व श्रीमती प्रांजली सोनवणे (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शालेय विद्यार्थिनींसाठी 3 दिवसीय स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दि. 04 व 05 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, अमरावती येथे आयोजित प्रशिक्षणामध्ये मनीबाई गुजराती हायस्कूल, श्रीमती शोभाबेन सेठिया हायस्कूल, वनिता समाज हायस्कूल आणि श्रीमती कस्तुरबा कन्या हायस्कूल येथील एकूण 610 विद्यार्थिनी व शिक्षकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरास पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती विल्लेकर, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती मेघाली गावंडे (भरोसा सेल) तसेच राखीव पोलीस निरीक्षक श्री. श्रीधर गुळसुंदरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCItyPolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=karateclasses nis:value=karateclasses nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=womenempowerment nis:value=WomenEmpowerment nis:enabled=true nis:link/>
अमरावतीत मोठी कारवाई 
277 ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद, ₹53.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

दि. 01/08/2026 रोजी राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अकोली रोड, साई हेरिटेज परिसरात सापळा रचून मोठी कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान साहिल राजेश मेहरा (वय 22 वर्ष), रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती याला एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थाची विक्री करताना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपीकडून 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, गुन्ह्यात वापरण्यात आलेली फोर्ड इकोस्पोर्ट चारचाकी तसेच 2 आयफोन असा एकूण ₹53.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी :

👤 साहिल राजेश मेहरा (वय 22 वर्ष)
रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती

जप्त मुद्देमाल :

💊 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज – ₹41,55,000/-
🚗 फोर्ड इकोस्पोर्ट चारचाकी – ₹10,00,000/-
📱 2 आयफोन – ₹1,70,000/-

💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹53,25,000/-

आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई

मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात राजापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCItyPolice nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=crimenews nis:value=CrimeNews nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=crimecontrol nis:value=CrimeControl nis:enabled=true nis:link/>
नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत "DRUG FREE CAMPUS" संकल्पनेला बळकटी

आज दिनांक ०१-०८-२०२६ रोजी मा. पोलीस आयुक्त, अमरावती शहर श्री. राकेश ओला, भा.पो.से. यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्यासोबत "DRUG FREE CAMPUS" संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संवाद बैठक आयोजित करण्यात आली.
@dgpmaharashtra 
<nis:link nis:type=tag nis:id=nashamuktbharat nis:value=NashaMuktBharat nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreecampus nis:value=DrugFreeCampus nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=SayNoToDrugs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safecampus nis:value=SafeCampus nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=youthawareness nis:value=YouthAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policepublicpartnership nis:value=PolicePublicPartnership nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=missiondrugfreeindia nis:value=MissionDrugFreeIndia nis:enabled=true nis:link/>
Video 9
CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-
आज दिनांक 22/07/2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने आयोजित अधिकारी मित्र (विधी स्वयंसेवक) प्रशिक्षण कार्यशाळेत अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
<nis:link nis:type=tag nis:id=cybersecurity nis:value=cybersecurity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=CyberAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCItyPolice nis:enabled=true nis:link/>
 <nis:link nis:type=tag nis:id=digitalsafety nis:value=DigitalSafety nis:enabled=true nis:link/>
CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
 एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=amravaticitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberpolice nis:value=cyberpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ceir nis:value=ceir nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lostmobilerecovery nis:value=lostmobilerecovery nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=publicservice nis:value=publicservice nis:enabled=true nis:link/>
हेल्मेट जनजागृती मोटार सायकल रॅली – अमरावती शहर वाहतूक शाखा
@DGPMaharashtra 
<nis:link nis:type=tag nis:id=helmetsaveslives nis:value=HelmetSavesLives nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wearisihelmet nis:value=WearISIHelmet nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=RoadSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=zerofatalitydistrict nis:value=ZeroFatalityDistrict nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=zfd nis:value=ZFD nis:enabled=true nis:link/> HelmetAwareness TrafficPolice AmravatiCityPolice
Video 14
Video 15
Video 16
Video 17
अमरावती शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!
वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दुहेरी खून प्रकरणातील 5 मुख्य आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

@dgpmaharashtra

 <nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=AmravatiCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimebranch nis:value=CrimeBranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=doublemurdercase nis:value=DoubleMurderCase nis:enabled=true nis:link/>
Video 19
CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-
CEIR (Central Equipment Identity Register) Portal च्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशन व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ३७७ गहाळ/हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले.
 एकूण अंदाजित किंमत : ₹६५,६३,८००/-

दिनांक २८ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हे मोबाईल अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच परराज्यातून शोधून हस्तगत करण्यात आले.
@dgpmaharashtra 
@mahacyber 
<nis:link nis:type=tag nis:id=amravaticitypolice nis:value=amravaticitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberpolice nis:value=cyberpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ceir nis:value=ceir nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lostmobilerecovery nis:value=lostmobilerecovery nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=publicservice nis:value=publicservice nis:enabled=true nis:link/>
Video 22
Video 23
Video 24