अमरावती महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी राकेश ओला यांनी विसर्जनादरम्यान नागरिकांनी घ्यावयाची काळजी व प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.
विसर्जनस्थळी स्वच्छता, निर्माल्य संकलन, आवश्यक कर्मचारी व इतर व्यवस्थेसह प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन उत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#AmravatiMunicipalCorporation #Amravati
833 views | Amravati, Maharashtra | Sep 26, 2026