पुण्यात १७ वर्षीय शिवकुमार बाबू वखाराणीचा नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पोलिस तपासानुसार, त्याचा सहा जणांनी पाठलाग केल्याचा संशय असून, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवकुमार हा २६ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. बंडगार्डन बंधाऱ्याजवळील बर्निंग घाट परिसरात नेल्यानंतर तो बेपत्ता झाला. २९ सप्टेंबर रोजी चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह नदीत आढळला.
शिवकुमारवर आधी मारहाण झाली होती की, आरोपींच्या पाठलागातून बचावण्याचा प्रयत्न करताना तो नदीत पडला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बंडगार्डन पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पुण्यातील या धक्कादायक प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कॅरोसेल स्वाइप करा.
#PuneNews #PuneCrime #PuneNewsToday #MaharashtraNews #TimesOfMaharashtra