फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानात उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये गंभीर घटना घडली. मुंबईतील घाटकोपरचे कॅप्टन सुमित मच्छार जखमी झाले, मात्र त्यांनी परिस्थिती हाताळत १७४ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनेनंतर विमान सौदी अरेबियातील तबूक येथे वळवण्यात आले आणि सुरक्षित लँडिंग करण्यात आले. कॅप्टन मच्छार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कॅप्टन सुमित मच्छार यांना १३ वर्षांहून अधिक व्यावसायिक विमानवाहतूक अनुभव असून त्यांनी सुमारे ९,७५० तासांचे फ्लाइंग केले आहे. बोईंग ७३७ विमानांवरील त्यांचा मोठा अनुभव आहे.
कॉकपिटमध्ये नेमकी घटना कशी घडली आणि त्यामागील कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.
#FlyDubai #SmitMachchhar #MumbaiNews #AviationNews #TimesOfMaharashtra