सम्राट अशोक विद्यालयात ज्येष्ठ बालकवयित्री सुरेखा गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
“पालकांनी मुलांच्या कलागुणांना संधी द्यावी” — सुरेखा गावंडे
कल्याण : पाली भाषा प्रचार व प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय, सम्राट अशोक हायस्कूल, सेंट वाय.सी. इंग्लिश स्कूल, विपश्यना बालविहार आणि सम्राट अशोक इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ बालकवयित्री सुरेखा गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरेखा गावंडे यांनी जात-धर्माचा भेद न करता देशाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. “शिक्षणाला जात-धर्माचे बंधन नसते. खरी श्रीमंती ही शिक्षणात आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याची संधी दिली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शनाच्या शेवटी सुरेखा गावंडे यांनी गाजर, �
Kalyan, Thane | Aug 15, 2026