हिंगणा: आंबेडकर चौक येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तींचा मृत्यू
Hingna, Nagpur | Sep 28, 2026 28 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हिंगणा हद्दीतील आंबेडकर चौक येथे एक 55 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे मृतदेहाची ओळख पाठविणे अजून बाकी आहे. मृतकाच्या उजव्या हातावर बाबाराव लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.