आधुनिक शेतीच्या दिशेने… गडचिरोलीतील शेतकऱ्यांची नवी वाटचाल!
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’ अंतर्गत अतिदुर्गम भागातील 37 शेतकरी 17 व्या कृषीदर्शन व अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या 8 दिवसीय अभ्यास दौऱ्यात शेतकरी विविध कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे व प्रगत शेती प्रक्षेत्रांना भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि शेतीच्या नव्या पद्धती जाणून घेणार आहेत.
यापूर्वी आयोजित 16 कृषी अभ्यास दौऱ्यांतून 738 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, आधुनिक ज्ञानातून शेती अधिक सक्षम आणि शेतकरी अधिक समृद्ध करण्याचा हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
नवे तंत्रज्ञान • नवी दृष्टी • समृद्ध शेती
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’!
#GadchiroliPolice #PoliceDadhaloraKhidki #ProjectKrushiSamruddhi #FarmerEmpowerment #ModernFarming
@dgpmaharashtra
Gadchiroli, Maharashtra | Sep 30, 2026