रामटेक: रामटेक नगरवासीयांची मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी
Ramtek, Nagpur | Aug 6, 2026 मागील काही दिवसांपासून रामटेक शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून त्यामुळे नगरवासी, विद्यार्थी,विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असून वेळीच याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगर वासीयांनी दिनांक सहा ऑगस्टला केली आहे. पावसाळ्याचा दिवसात कुत्र्यांचा त्रास अधिकच वाढला असल्याचेही त्यांनी सांगितले.