कामठी: हद्दपार आरोपी कामठीत जेरबंद; विनापरवाना प्रवेश करताना लोखंडी चाकूसह अटक
Kamptee, Nagpur | Aug 15, 2026 जुनी कामठी पोलिसांनी हद्दपार केलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी मोहम्मद शाहीद याला नागपूर शहर परिमंडळ-६ चे हद्दपार आदेश असतानाही विनापरवाना कामठी शहरात प्रवेश केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार लोखंडी चाकू मिळून आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्निल चव्हाण व पथकाने केली.