कळमेश्वर: कळमेश्वर शहरात दीप अमावस्या उत्साहात साजरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कळमेश्वर शहरात दीपमावस्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त नागरिकांनी घरांची स्वच्छता करून सायंकाळी दिवे प्रज्वलित केले. विविध ठिकाणी आकर्षक दीपसजावट करण्यात आल्याने शहराचा परिसर प्रकाशाने उजळून निघाला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने दीपपूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. अनेक घरांमध्ये रांगोळी व पणत्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती