अंधश्रद्धेचा काळा डाव उधळला! पोक्सो व अघोरी प्रथा कायद्यान्वये गुन्हा दाखल
"पैसाचा पाऊस" पाडण्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कट रचणाऱ्या 15 जणांच्या टोळीचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
ही घटना 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता लातूर-उदगीर रोडवरील करडखेल पाटी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी "लक्ष्मीपूजा" च्या नावाखाली अघोरी विधी करण्याचे नियोजन केले होते.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026 दाखल करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 चे कलम 3(3) आणि पोक्सो कायद्याचे कलम 12 सह 18 लावण्यात आले आहेत.
*आरोपींची नावे:*
1. कुंडलीक देवराव रूपनर - बीड
2. सचीन साहेबराव भोंगळे - अकोला
3. अनिकेत सुभाष राठोड - परभणी
4. समीर टिनघरे - पुणे
5. लक्ष्मण विठ्ठल करंजी - संगारेड्डी, तेलंगणा
6. सनेश सुकुमार पनिके - संगारेड्डी, तेलंगणा
7. दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला - संगारेड्डी, तेलंगणा
8. श्रीनिवास विरख्या चिलमुला - संगारेड्डी, तेलंगणा
9. बालाजी रघुनाथराव बिरादार - संगारेड्डी, तेलंगणा
10. चंद्रया सुंदरराव कारम - पश्चिम गोदावरी, आंध्रप्रदेश
11. अनंतराव गंगाराम खुनिकार - रंगारेड्डी, तेलंगणा
12. राजेश मोगली ईपन्नापल्ली - हैद्राबाद
13. सुनिल कल्याण डेंगले - पुणे
14. राजू सेवु पवार - विजापूर, कर्नाटक
15. बालाजी - पूर्ण नाव माहित नाही
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
Latur, Latur | Aug 17, 2026