परतूर: लोकसभेत,विधानसभेत पराभवाने विरोधक निवडणूक आयोगावर आरोप करत आहे आ. बबनराव लोणीकर यांची भाजप कार्यालयावर विरोधकांवर टीका
Partur, Jalna | Sep 30, 2026 आज दिनांक 30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे व म्हटले आहे की , लोकसभा व विधानसभेत विरोधकांचा पराभव झाला जनतेनं त्यांना घरचा रस्ता दाखवला त्यामुळे ते आदळ आपट करत निवडणूक आयोगावर खापर फोडत आहे ,अशी टीका आज माझी मंत्री आमदार बाबूराव लोणीकर यांनी भाजपा कार्यालयावरून विरोधकांवर केली आहे.