मुंबई उपनगर: मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 'हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन' लवकरच सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन' राबविण्याचे आदेश दिले. बालकांच्या पहिल्या 1000 दिवसांत पोषण, आरोग्य, लसीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. शहरी कुपोषणावर लक्ष देऊन अंगणवाडी सेवा वाढवण्यावरही भर आहे.