रामटेक: राखी तलाव परिसर रामटेक येथे मोठ्या उत्साहात गणेश बाप्पांना निरोप
Ramtek, Nagpur | Sep 26, 2026 गणेशोत्सवाच्या 12 दिवसाच्या धमधूमीनंतर अनंत चतुर्दशीला 25 सप्टेंबर ला रात्री बारा वाजता पर्यंत गणेश मूर्त्याचे विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'... 'एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला' च्या गजरात विविध वाद्याच्या तालावर, विविध वाहनांनी, विविध रूपातील बाप्पाना यावर्षी निरोप देण्यात आला.