📍लातूरचं राजकारण सुसंस्कृत म्हणता म्हणता दिशा भरकटतेय?
लातूर :लातूरच्या राजकारणाची ओळख नेहमीच सुसंस्कृत राजकीय परंपरेसाठी केली जाते. मात्र, अलीकडील काही घटनांमुळे या प्रतिमेलाच धक्का बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी नगरसेवकांकडून थेट मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींनी प्रशासनासोबत संवाद साधून प्रश्न सोडवणे अपेक्षित असताना, दबाव किंवा हिंसक मार्गाचा अवलंब होत असेल तर त्यावर आत्मपरीक्षणाची गरज आहे.
“आम्ही लातूरचा सुसंस्कृतपणा अबाधित ठेवतोय” असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे नाही का?
राजकीय मतभेद असू शकतात, प्रशासनातील निर्णयांवर आक्षेपही असू शकतात; मात्र लोकशाही व्यवस्थेत प्रश्न सोडवण्याचा मार्ग संवाद, कायदा आणि घटनात्मक प्रक्रिया हाच असायला हवा.
लातूरच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला हिंसक वळण लागणार नाही, याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?
Latur, Latur | Aug 18, 2026