Public App Logo
Profile Picture

द महाराष्ट्र न्यूज

@dgiri8187
350Followers
0Following
📍लातूर तुळजापूर शिवली हायवे कडेला असलेल्या उसामध्ये अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृत्यूदेह. परिसरात उडाली खळबळ.
लातूर पोलीस एखाद्या दहशत मजवणाऱ्या गुंड प्रवरतीला असा धडा कधी शिकवणार
लातूरकरांनो चार दिवसाचे पाणी सहा दिवसावर 
 पाणी जपून वापरा 
<nis:link nis:type=tag nis:id=दुष्काळ nis:value=दुष्काळ nis:enabled=true nis:link/>
लातूर जिल्हा कायद्या चा बाले किल्ला 
 कोयता गॅंग ची धिंड
📍कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल -लातूर पोलीस.
📍लातूर शहरात काल कोयता गँग ने किरकोळ कारणावरून दोन युवकांना कोयत्याने मारत त्यांना जखमी केल्याची घडली.
📍काल शिवाजीनगर पोलिसांनी 3/4तासात शोध घेऊन त्या गँग ला अटक करत त्यांची दहशत मोडून काढली.
📍बाहेरून येऊन लातुरात दहशत निर्माण करणाऱ्या नां लातूर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवायला हवा. तुमचं मत कमेंट करा.
📍उदगीर च्या व्यापाराला नवीन ओळख देणार आमदार संजय बनसोडे
📍उदगीर च्या व्यापारा साठी 100 एकरावर सुसज्ज नवीन बाजार समिती उभारण्याचा मानस असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केला.
📍लातूर शहरावर पाणी टंचाई संकट फार भीषण असणार आहे.
या भीषण परिस्थिती चा अंदाज लातूररांना मुळीच नाही.
📍प्रशासनाकडून पाणी टंचाई वर ठोस उपाय योजना होताना अद्याप दिसत नाहीत.
लातूर जिल्ह्यातील वृत्तपत्र मालकांची बैठक मोठ्या उत्सहात संपन्न.
📍लातूरकरांनो शहरात पुन्हा वाढतेय कोयत्याची दहशत.
📍 ट्युशन एरियाच्या ठाकरे चौकात दोन युवकांवर कोयत्याने हल्ला.
Video 10
📍 लातूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळा नेमका किती मोठा.
📍प्रभाग 16 च्या नगरसेवकानी केलेल्या अतिक्रमण आणि अवैध बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक होत चक्क झोनल अधिकाऱ्याच्या दालनाला ठोकले ताळे
लातूरच्या स्क्रॅप मार्केट मध्ये भीषण आग अग्निशमन दलाचे जवान करतायेत शर्तीचे प्रयत्न
📍क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल करत जीआरची होळी केली.
 तात्काळ हेक्‍टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर करा म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रोश व्यक्त केला.
लातूरच्या स्क्रॅप मार्केट मध्ये भीषण आग अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना
📍लातूरमध्ये दोन गटात हाणामारी; कार अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न
लातूर शहरातील गिरवलकर मंगल कार्यालय ते PVR चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका युवकाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
कारखाली अडकलेल्या जखमी युवकाला नागरिकांनी बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. खासगी विहिरीत गणपती विसर्जन करण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेचा अधिक तपास MIDC लातूर पोलीस करीत आहेत.
*जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा; जीपॅट व नायपर-जेईई यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव*

निलंगा : महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, महाराष्ट्र पॉलिटेक्निक (डी.फार्म) इन्स्टिट्यूट आणि निलंगा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह-२०२६ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे प्रतिनिधी पृथ्वीराज विजय पाटील निलंगेकर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ, महाराष्ट्र विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मोहन नटवे, लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष ओम बाहेती, तालुका अध्यक्ष बालाजी थेटे यांच्यासह पंकज शेळके, सोमनाथ आग्रे, राजेंद्र धूत, हंसराज शिंदे, किशन बाहेती, बाबुआप्पा महाजन, ओम आग्रे, विकास सोळंके, सतीश चाकोते, अभिषेक गडीकर, गुरुनाथ सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
*जनजागृती रॅली व फार्मासिस्ट शपथ:* फार्मासिस्टची आरोग्य सेवेतील महत्त्वपूर्ण भूमिका आणि समाजातील योगदान याबाबत जनजागृती करण्यासाठी निलंगा शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, प्राध्यापक, फार्मासिस्ट व असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, प्रतिजैविकांचा जबाबदारीने वापर आणि फार्मसीची सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती केली. यावेळी डॉ. सी. व्ही. पांचाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना फार्मासिस्टची शपथ दिली. आरोग्य सेवेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मान्यवरांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला व महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

*यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव:*
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून जीपॅट (GPAT) व नायपर-जेईई (NIPER JEE) २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. जीपॅट-२०२६ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर नायपर जेईई-२०२६ मधील यशस्वी विद्यार्थ्यांना केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, निलंगा यांच्यावतीने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. श्रुती बैनगिरे, एजाज शेख, निकिता स्वामी, सोमेश ठाकरे, गुरुनाथ शेळके, देवानंद जाधव, श्रद्धा बैनगिरे, ऋतुजा भांडे, सुदर्शन शिंदे, सोनक कुमार आणि ओंकार बारहाले या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. एस. एन. पंचभाई यांनी मानले.
📍केंद्र सरकार चा जनतेला मोठा दिलासा 
खाद्य तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने होणार खाद्य तेल स्वत.
📍सरकार करणार अग्निविरांचं पुनर्वसन
लातूर जिल्ह्यावर दुष्काळा सह भीषण पाणी टंचाईचे संकट.
📍एक छोटासा प्रयोग.
ह्या व्हिडीओ मधे चालू परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे योग्य वाटलं तर नक्की कमेंट करा.
🚨 लातूर-बोरी-देवणी रस्त्याची दुरावस्था; मोठा अपघात थोडक्यात टळला!
चालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले
लातूर-बोरी-देवणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, याचा फटका प्रवाशांना बसत आहे. रस्त्यावरील खराब परिस्थितीमुळे बसचा अपघात होता होता टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
मात्र, या घटनेमुळे ३० ते ३५ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिक आणि प्रवाशांनी बोरी-देवणी रस्ता तात्काळ दुरुस्त करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार?
📍शासन निर्णय झाला- लातूर सह 265तालुक्यात दुष्काळ जाहीर.
📍राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा सहाव्वा समाधी सोहळ्याला सर्व समाज बांधवानी आणि भाविक भक्तांनी आवर्जून भक्ती स्थळ अहमदपूर येथे यण्याची विनंती दत्ता खंकरे यांनी केली आहे.