रामटेक: कांद्री चेक पोस्टवर राडा : ट्रकचालकाला मारहाण झाल्याचा आरोप ;संतप्त ट्रक चालकांचे महामार्गावर आंदोलन
Ramtek, Nagpur | Sep 25, 2026 नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री चेक पोस्टवर शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सुमारे बारा वाजताच्या दरम्यान ट्रकचालकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेनंतर संतप्त ट्रक चालकांनी आपले ट्रक महामार्गावर उभे करीत आंदोलन केले.त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि सुमारे दोन तास पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.