मुंबई उपनगर: अंगणवाडी सेवा कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी वाढीचा आणि वयोमर्यादा 60 करण्याचा विचार
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता वाढवण्याबाबत महिला व बालविकास मंत्रालयात सकारात्मक चर्चा सुरू आहे. ग्रॅच्युइटी वाढीबरोबरच, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 करण्याचा विचार करण्यात येत असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.