कळमेश्वर: अनंत चतुर्दशी निमित्त कळमेश्वर शहरात गणरायाला भावपूर्ण निरोप
अनंता चतुर्दशीच्या निमित्ताने कळमेश्वर शहरात विविध ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील विविध गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढत बाप्पाचे