रामटेक: अंबाळा येथील पुजाऱ्याच्या स्नानगृहात रेस्क्यू करून पकडला दुर्मिळ फॉरेस्टन मांजऱ्या साप
Ramtek, Nagpur | Aug 10, 2026 रामटेक शहरा अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनारायण स्वामी मंदिर अंबाळा येथे राहणाऱ्या एका पुजाराच्या स्नानगृहातून दहा ऑगस्टला अचानक एक साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या पुजाऱ्याने तात्काळ रामटेक येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेकचे सर्पमित्र निलेश विश्वकर्मा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुर्मिळ फॉरेस्टन मांजऱ्या सापाचा रेस्क्यू केला व त्याला जंगलात नेऊन सोडले.