रामटेक: सुपर मार्केट रामटेक दुकानदारांवर चालला नगरपरिषद अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा
Ramtek, Nagpur | Sep 30, 2026 सुपर मार्केट रामटेक परिसरातील नगरपरिषद कॉम्प्लेक्स अंतर्गत दुकान चाळीतील गुरुमाऊली हनुमान मंदिर ते हमीदभाई जनरल स्टोअर्स पर्यंतच्या दुकानासमोरील अतिरिक्त ओटे नगरपरिषद अतिक्रमण हटाव पथकाने तीस सप्टेंबरला जेसीबीच्या साहाय्याने हटविले.नप मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषद चे अतिक्रमण हटाव पथकाने तब्बल आठ दुकानांच्या शटर समोरील ओटे हटविले.