रामटेक: बोरडा येथे सेंद्रिय व नैसर्गिक शेती मार्गदर्शन शिबिर संपन्न ; राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी केले उद्घाटन
Ramtek, Nagpur | Sep 28, 2026 ज्ञानाकडून शाश्वत शेतीकडे या उद्देशाने अस्मिता इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गेनिक अँड नॅचरल फार्मिंग यांच्या वतीने आयोजित मोफत सेंद्रिय व नैसर्गिक शेती मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ अठ्ठावीस सप्टेंबर ला उत्साहात झाला. महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल, माजी खासदार तथा AICC सरचिटणीस अविनाश पांडे आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ-मार्गदर्शक डॉ. एम. एन. वेणुगोपाल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.