नरखेड: नरखेड हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर 'हद्दपारी'ची कारवाई
Narkhed, Nagpur | Aug 15, 2026 अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या पाच सराईत गुन्हेगारांवर नरखेड पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार हद्दपारीची कारवाई केली आहे.हद्दपार करण्यात आलेल्या आरोपी मनोज उर्फ लाला रमेश नारनवरे, रंघू बादल धुर्वे यांना दोन महिन्यासाठी तर मिलिंद नथुजी तागडे,गणेश उपाराव धुर्वे,रेखा दिवाकर सलामे यांना एका महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आरोपींवर अवैध दारूबाबत अनेक गुन्हे दाखल होते.