रामटेक: सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामटेक येथे पोलिसांचा रूट मार्च ; पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांची उपस्थिती
Ramtek, Nagpur | Sep 23, 2026 पो स्टे रामटेक अंतर्गत दिनांक 23 सप्टेंबरला शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सव,गणेश विसर्जन लक्षात घेता रामटेक शहरात पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला. गणेशोत्सव व गणेश विसर्जन शांततेत, सुव्यवस्थेत पार पडावे या उद्देशाने रामटेक शहरात मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे या रूट मार्च नेतृत्व पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष एक पोद्दार यांनी केले.