कळमेश्वर: उबगीजवळ रेल्वे पटरीवर मृतदेह आढळला; रेल्वे अंडर पासिंग पूल कामगाराचा असल्याची प्राथमिक माहिती
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील उबगी गावाजवळ रेल्वे पटरीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती रेल्वे अंडरपास पुलाच्या कामाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. मृत व्यक्तीची ओळख दीपक गोपीलाल गौर (वय 29), रा. मोरटक्का, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश अशी समोर आली आहे.