आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपा आयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस अधिकारी व तपासी अंमलदार यांच्याकरिता सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, प्राथमिक तपास, डिजिटल पुरावे, आर्थिक सायबर फसवणुकीतील Golden Hour, 1930 हेल्पलाईन, NCRP Portal, मोबाईल व सोशल मीडिया सुरक्षेसह विविध तांत्रिक बाबींवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या चर्चासत्रामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्री भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनासह सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ श्री. अविनाश पाटील यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासातील तांत्रिक बाबी व नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन केले.
तसेच पोलीस फौजदार श्री. श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक श्री. इंगळे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
31 views | Solapur, Maharashtra | Aug 14, 2026