आज दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रोजी महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर व बाल न्याय मंडळ, सोलापूर तसेच Catalysts for Social Action (CSA) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळातील बालक व पालक यांच्यासाठी एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात संपन्न. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार मॅडम, अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, सोलापूर यांनी भूषविले. या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.न्यायाधीश श्रीमती अश्विनी बिराजदार मॅडम, मा. अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 🌺🌿✨कार्यक्रमादरम्यान बालक व पालकांसाठी सायबर सुरक्षा, सोशल मीडिया वापरातील सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डिजिटल गोपनीयता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
12 views | Solapur, Maharashtra | Aug 13, 2026