रामटेक: रामटेक येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा, परंपरागत वेशभूषेतील मूलनिवासीयांनी दुमदुमले रामटेक
Ramtek, Nagpur | Aug 9, 2026 जागतिक आदिवासी मूलनिवासी दिनानिमित्त रामटेक येथे 9 ऑगस्टला परंपरागत वेशभूषेतील मूलनिवासी महिला, पुरुषांनी भव्य रॅली काढून तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आदिवासी दिन अत्यंत उत्साहात साजरा केला. शांती मंगल कार्यालय रामटेक येथे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.