रामटेक: होटल शिकारा रामटेक च्या पुढे कारच्या धडकेत दुचाकी चालक भाऊजी ठार तर साळा जखमी
Ramtek, Nagpur | Aug 5, 2026 रामटेक- खिंडसी मार्गावरील चिचाळा वळणावर असलेल्या हॉटेल शिखराच्या पुढे एका कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी सोबत अमोरासमोर धडक झाली. यात दुचाकी चालकाचा मेडिकल हॉस्पिटल नागपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर जखमी युवकास उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे प्रथमोपचारानंतर मेडिकल हॉस्पिटल नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. ही घटना बुधवार दिनांक पाच ऑगस्टला रात्री साडेसात वाजता च्या दरम्यान घडली.