उमरेड: ४० हजारांची लाच स्वीकारताना WCL चा वरिष्ठ पर्यवेक्षक सीबीआयच्या जाळ्यात
Umred, Nagpur | Oct 1, 2026 वेस्टन कोलफिल्ड्स लिमिटेडच्या उमरेड खान प्रकल्पातील गोकुळ मुरपर उपक्षेत्रात कार्यरत वरिष्ठ पर्यवेक्षक पवन नखाते याला ३० सप्टेंबर रोजी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंगापूर चौकाजवळ सापळा रचून ही कारवाई केली. पिरवा गावाच्या पुनर्वसनस्थळी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी कंत्राट मिळवून दिलेल्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी आरोपीनेलाचेची मागणी केली होती.